________________
MATION
सारा PMBER
असणे शुभयोगाचे फळ आहे. दुःखी होणे अशुभाचा भोग आहे. या सुख-दुःखाच्या पलिकडे शुद्ध आत्मभावभोगाने योगात प्रवेश करायचा. मानवाचा श्रेष्ठ पुरुषार्थ आहे खरी शाश्वत सख-शांती प्राप्त करणे. अशुभ भावाचे मंथन, शोधन व विरेचन करून त्यांना शुभ-भावनेत स्थित करण्याची प्रक्रिया आत्मा, महात्मा आणि परमात्माची विकसित श्रेणी आहे.
सिद्धांताच्या दृष्टीने जीवाचे असंख्य परिणामांचे मध्यम वर्णन चौदा गुणस्थानांच्या रूपाने केले आहे. त्या गुणस्थानांचे संक्षेप रूपाने वर्णन करताना असे घटित होऊ शकते की प्रथम तीन गुणस्थानांचे तारतम्यपूर्वक कमी झाले तर अशुभयोग घटित होतो. चवथ्यापासून सहाव्या गुणस्थानापर्यंत तारतम्यपूर्वक वाढत जाऊन शुभोपयोग, सातव्या पासून बाराव्या गुणस्थानांपर्यंत तारतम्यपूर्वक शुभ आणि शुद्धोपयोग आणि शेवटचे दोन गुणस्थान यात मात्र शुद्धोपयोग फलित होतो, असे वर्णन काही अंशी करू शकतो. आत्म्याचे ज्ञान, दर्शन चारित्र इ. गुणांची शुद्धी-अशुद्धी आणि उत्कर्ष-अपकर्षाचे वर्गीकरण गुणस्थानात होतो.
आपले वर्तन आपल्या जीवनातील वागणुकीतून प्रकट होत असते. आत जे भाव असतात तसेच ते बाहेर अनायास प्रकट होत असतात. यालाच जीवन व्यवहाराची अभिव्यक्ती म्हणता येईल. जर एखाद्या नदीचा मूळस्रोत विषाने माखलेला असेल तर त्याच्या लाटा, त्याचे उडणाऱ्या तुषारात विष असणारच आणि जर तो मूळ स्रोत अमृताने युक्त असेल तर त्याच्या लाटेत, तुषारात अमृतच असणार. सर्व पाणी अमृतमय असेल.
___ एका खोलीत अंधार असेल तर आपण त्या खोलीत कधी भिंतीला ठेचकाळू तर कधी दाराशी टक्कर होईल. कधी भिंतीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत राहू. बाहेर कदाचित निघू पण सर्वांशी टक्कर घेतल्यावरच. समजा त्या रूममध्ये कोणी दीपक आणला तर अडथळे आपोआप दूर होतील. ही बाहेरून लावलेली ज्योती मार्गदर्शक बनते, पण ती बाह्य ज्योती आहे. ती विझूपण शकते. परंतु आंतरिक आत्मज्योती अशी विझणारी नसते. ती पेटवायला अतिशय परिश्रम घ्यावे लागतात. पण एकदा ती प्रज्वलित झाली की मग मात्र कधीच विझणार नाही. कारण ती आंतरिक आत्म्याची ज्ञानरूपी ज्योत आहे कधीच न विझणारी.
___आजही आपली आंतरिक ज्योत तेवत आहे. विझाली तर ती कधीच नाही. कारण तीच आपली चेतना आहे. आंतरिक चेतनेचा एक भाग आहे. ती चेतना तेवतच आहे. फक्त तिच्याप्रती आपण जागरूक नाही. एकदा त्या चेतनाच्या आस्तित्वाची आपल्याला