________________
।
अनुभूती झाली की मग ती चिरस्थायी होऊन जाते. आपला जीवनव्यवहारच त्यामुळे बदलून जाईल. अज्ञानाच्या अंधारात ठेचाळणे संपून जाईल. परंतु त्यासाठी आत्मलक्षी बनणे अत्यंत आवश्यक आहे.
या संसारातील प्रत्येक प्राणी आत्मविकास करू शकतो. आत्मचिंतन व आत्मविकास यांवर कोणाही देश, जाती, वर्ण, वर्ग, धर्मविशेषाचा एकाधिकार नाही. कारण भारतीय चिंतकांनी आध्यात्मिक साहित्य व समस्त धर्मग्रंथात आत्म्याच्या चरम विकासाचे ध्येय मोक्षच मानले आहे.
आत्मचिंतक कितीही कष्ट, दुःख आले तरी त्याचा सामना करून ह्यावर विजय मिळवू शकतो.
व आत्मचिंतन करण्याअगोदर सर्वप्रथम क्षेत्रविशुद्धी करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे शेतकरी शेतात बी पेरण्याच्या अगोदर शेतातील तृण, दगड-गोटे नांगरून मग पेरतो त्याचप्रमाणे आत्मभावनेचे चिंतन करण्याअगोदर आपल्या आत्म्यावर राग-द्वेष, विकारांचे जे तृण साचलेले आहे त्यांना काढून टाकायला हवे. आत्मभूमीवर दुर्गुणांचे दगडघोंडे विखुरलेले आहेत ते दूर करून सद्गुणांचे बी पेरायला पाहिजे. अशुभ-प्रवृत्तींपूर्णपणे त्याग केल्याने शुभ प्रवृत्तींद्वारा संसाराची असारता, अनित्यता, अशरणता इ. वैराग्य भावाने ओतप्रोत होते.
चित्तशुद्धीसाठी शुभप्रवृत्ती असणे आवश्यक आहे. कारण अशुभ वृत्तींचा नाश स्वतः नाही होत. त्यासाठी चित्तातील अशुभवृत्तींना शुभवृत्तीत रूपांतरित करणे आवश्यक आहे. शुभप्रवृत्तीमुळे शुद्धोपयोग किंवा शुद्धात्मभावाचा विकास होणे संभव आहे.
__ ज्याप्रमाणे फुग्यात हवा जसजशी भरली जाते तसतसा तो फुगत जातो तसाच तो पातळ होत जातो आणि जर जास्त हवा भरली गेली तर तो फुटून जातो. हेच उदाहरण शुभभावांना लागू होते. जसजशी शुभ भावांची वृद्धी होत जाते तसतसे आत्म्यातील कषाय पातळ होत जातात आणि शुभ भाव किंवा शुभप्रवृत्ती आपल्या चरम सीमेवर पोहोचतात, तेव्हा ते कषायरहित होऊन शुद्ध भावात लीन होऊन जातात.२ शुभ भाव अशुभ-भावांना नष्ट करतात आणि शुद्ध भावा निर्माण करण्यात साहाय्यक होतात.
आगमामध्ये आत्मभावना आत्म्यासंबंधी किंवा शुद्धोपयोगमय भावनाच्या संदर्भात आगमामध्ये वेगवेगळ्या प्रकारे विवेचन केले गेले आहे.