________________
(६४८)
आहे. या जगात कोणतीही वस्तू स्थिर नाही. केव्हांतरी तिचा वियोग होतोच. अशा
सबद्दल आसक्ती ठेवणे म्हणजे दुःखाचे कारण आहे. सुखेच्छू मानव अशा क्षणिक वस्तमध्ये राग-द्वेष करणे योग्य समजत नाही. ज्याचा द्वेष केला जातो ते पदार्थही क्षणिक आहेत. कारण पुद्गल मात्र परिणती स्वभावाचे आहेत. जो पदार्थ आता रूचिकर वाटतो तोच पदार्थ काही काळानंतर अरुचिकर वाटतो. म्हणून कोणाच्याही बद्दल द्वेष करू नये. तसेच पदार्थाच्या लाभ-अलाभ यात शोक करू नये. दोन्ही स्थितीत मध्यस्थ रहावे.
माध्यस्थ भावनाचे विवेचन करताना तत्त्वार्थसूत्राच्या दीपिका नियुक्तीमध्ये पू. घासीलालजी महाराज लिहितात- अविनित शठ अशा लोकांबद्दल उदासीनता भाव ठेवायला पाहिजे. ज्यांना ज्ञान दिले जाऊ शकते, जे त्याच्या योग्य आहेत, ते विनित आहेत, जे ज्ञान घेण्यास अपात्र आहेत, ते चेतन असूनही जड आहेत. सम्यगज्ञानविरहित आहेत. अज्ञानींच्या प्रभावाखाली आहेत अशा लोकांचा सुद्धा द्वेष न करता त्यांच्याविषयी उदासीन भाव ठेवायला पाहिजे. कारण नापिक जमिनीत रुजवलेले शुद्ध बी सुद्धा फलित होत नाही. त्याचप्रमाणे अशा लोकांना दिलेला सद्उपदेश फलित होत नाही.१०५
मध्यस्थ राहिल्याने भविष्यात लाभ होण्याची संभावना असते. जर क्रोध करून आलतु फालतू बोलू लागलो तर शब्द पकडले जातील आणि ते शब्द आपल्यालाच अपराधी सिद्ध करतील. परिणामतः आपले शब्द खरे असून खोटे साबित होईल. जर मौन राहिलो तर समोरच्या व्यक्तीला आपल्या अपराधाबद्दल विचार करण्याचा अवधी मिळेल. आणि कदाचित ती व्यक्ती आपल्या अपराधाची क्षमा मागायला येईल सुद्धा. म्हणून क्रोध करून वातावरण बिघडवण्यापेक्षा उदासीन राहून बिघडलेले वातावरण सुधारण्याची संधी द्यायला पाहिजे. उदासीन भाव ठेवल्याचे अपार शांती अनुभवायला मिळते. माध्यरथ्य, उदासीन, उपेक्षा हे शब्द पर्यायवाची आहेत.१०६
युवाचार्य मधुकरमुनिजी महाराजांनी श्रावकांना पवित्र जीवनाची प्रेरणा देताना म्हटले 'श्रावक सदगुण' अशा शीर्षकाखाली काही श्लोक लिहिले आहेत. त्यात श्रावकात माध्यस्थ्य भावनाची किती आवश्यकता आहे त्यावर एक सुंदर श्लोक लिहिला
"मध्यस्थो गुणवान विज्ञो धीरो वीरोऽस्ति यः प्रियः।
औदासिन्य समापन्नः श्रावकः स प्रकिर्तित ॥" यापुढे जाऊन ते लिहितात - माध्यस्थ्य वृत्ती जागृत झाल्याने व्यावहारिक भावनातील हजारो प्रश्न आपोआप सुटू लागतात. जीवनात कलह, विग्रह एवं विवाद होणेच