________________
(६५१)
धर्माचे, सम्यक्त्वाच्या आगमनाने 'स्व'च्या जागी 'सर्व' येतात. सर्वांच्या सुखाची चिंता, सर्व गुणीजनांच्याबद्दल प्रमोदभाव, सर्वदुःखी प्राण्यांबद्दल करुणा आणि सर्व पापी प्राण्यांबद्दल उपेक्षाभाव येतो.
या चार भावनांना जो आपल्या आत्म्यात स्थान देतो. भक्ती करतो तो महापुरुष विस्कळित झालेल्या विशुद्ध ध्यानाची कडी पुन्हा जोडतो. १०८
या चार भावना मुनीजनांसाठी आनंदरूप अमृत झरणाऱ्या चंद्राच्या चांदण्यांसमान आहेत. जो या भावनांनी युक्त आहे त्याचे कषाय मंद असतात. या भावना शेवटी मोक्षमार्गाकडे नेणाऱ्या असतात.
या भावनेत रमणारा योगी अत्यंत सअतिशय आत्मातून उत्पन्न झालेले अतिन्द्रिय सुखाला याच लोकात निश्चितपणेप्राप्त करतो. अर्थात अरिहंत भगवान जो आत्मिक आनंद प्राप्त करतात तसा आत्मिक आनंद याच भवात प्राप्त करतात. ते जगाच्या स्वरूपाला पाहून आत्मध्यानाकडे पुढे वाटचाल करतात. इंद्रिय विषयांचा मोह करीत नाहीत. स्वस्वरूपात रमण करू लागतात. मोहनिद्रा सोडून योगनिद्रे ( ध्यान ) मध्ये स्थित होऊन जातात.
या चार भावनांनी साधक भावित होतो. या भावनेच्या वश होतो. तो समस्त जगाकडे भाव दृष्टीने पाहाता पाहाता उदासीनतेला प्राप्त होतो. जगात जितेन्द्रिय जीव मुक्त आत्म्याप्रमाणे विचरण करतात. अर्थात् मुक्तीच्या सुखाचा अनुभव याच भवात
करतात.
अशा प्रकारे शुभध्यानाची सामग्री स्वरूप या भावनांच्या चिंतनाने ध्यानाची सिद्धी प्राप्त होते. १०९
आत्म्याच्या सूक्ष्म व स्थूल अथवा आंतरिक तथा बाह्य प्रयत्नांना वृत्ती म्हणतात. ते आत्म्याचा विजातीय, वैभाविक बाह्य पदार्थांच्या संयोग झाल्यामुळे त्यांना मिटवण्यासाठी भावनांची महत् युक्तता आहे. ११०
या चार भावनांचे वर्णन योगदर्शनातही आहे. त्यांनी या भावनांना चित्ताच्या प्रसन्नतेचे आणि मनाच्या निर्मलतेचे कारण मानले आहे. १११ ते लिहितात
मैत्री करुणा मुदितोप्रेक्षाणां सुखदुःख पुण्यापुण्य विषयाणां भावनात्श्चित्त
प्रसाधनम् ॥
या चार भावना प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात उपयोगी आहेत. आपल्या जीवनात