________________
(६४९)
होऊन जातात. आणि मग चेतनायुक्त आनंदमय, शांतीमय जीवनाचा आनंद प्राप्त
होतो. १०७
. माध्यस्थ्य भावना गीतामध्ये ज्याला 'स्थितप्रज्ञता' म्हटले आहे. त्याने रागद्वेषावर विजय मिळविला जातो.
। उदासीन भावात जेव्हा हर्ष शोकासारखे प्रसंग येतात तेव्हा त्या प्रसंगात हुरळून न जाता, हर्ष आणि विषादापासून चित्त अलिप्त ठेवून निस्पृह स्थिर रहावे लागते. डोळे, कान उघडे ठेवून सुद्धा मनावर त्याचा परिणाम होता कामा नये. श्रीमदाजचंद्रजींनी या भावनेचे यथोचित वर्णन केले आहे.
"शत्रु मित्र प्रत्ये वर्ते समदर्शिता, मान अमाने वर्ते ते ज स्वभावजो, जीवित के मरणे नहि न्यूनाधिकता, भाव मोक्षे पण शुद्धवर्ते समभावजो अपूर्व अवसर एवो क्यारे आवशे ।"
शत्रू असो अगर मित्र सर्वांवर समभाव असावा. कोणी बन्दो किंवा निन्दो आपल्या आत्म्याचा जो स्वभाव-शांत, दांत, क्षमा इ. त्यात बदल होता कामा नये.
_ मन फार संवेदनशील आहे. त्याच्यावर चांगल्या, वाईटाचा लवकर परिणाम होतो. तरीही अशा चंचल मनाला अभ्यासाने पुरुषार्थाने काबूत ठेवता येते.
चार योगभावनांचे सार आज जन-जीवनात आपण जी ईर्षा, संघर्ष आणि कलह होताना पाहतो त्याचे एकच कारण म्हणजे या भावनांचा अभाव. जर आपण मित्रता, गुणाग्राहकता, करुणा आणि तटस्थता भावना आत्मसात केल्या तर संसारातील अधिकांश दुःख व समस्या स्वयमेव दूर होऊन जातील.
जगात सगळ्यात मोठी समस्या 'रोटी, कपडा, मकान''च फक्त नाही. ही तर सामान्य समस्या आहे. अधिकांश समस्या मानवनिर्मित आहेत. माणसातील राग-द्वेषअहकार आणि स्वार्थ यांनी जास्त समस्या निर्माण केल्या आहेत. ज्या आपण रोज वाचतो, एकतो, पाहतो आहोत. ही मूळ कारणे जर नष्ट केली तर जगातील ९०% समस्या राहणारच नाहीत. या मानवीय समस्यांना दूर करण्यासाठी या योगभावना फार महत्त्वाच्या आहेत.
आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर आत्म्याचे पतन करणारे चार कषाय हत- (क्रोध, मान, माया लोभ) जे जन्ममरणाच्या बीजावर सिंचन करतात. अर्थात