________________
(६४७)
द्वेष करीत नाही. किंवा त्या रोग्याला मारीत नाही. परंतु रोगालाच दूर करण्यासाठी औषध किंवा शस्त्रांचा प्रयोग करतो. त्याबरोबर चिकित्सक सदैव जागृत राहतो की रोगी मरू नये. अशा प्रकारे माध्यस्थ्यदृष्टीवालेसुद्धा पापी, अत्याचारी व दुष्टांचा घृणा किंवा द्वेष करीत नाही. परंतु आत्मीयतापूर्वक त्यांच्या पापरूपी रोगाचा नाश करण्याचा प्रयत्न
करतात.
उदाहरण
घृणा किंवा द्वेष केल्याने वैर, विरोध वाढतो. परंतु जर माध्यस्थ्यभाव ठेवला तर शक्य आहे की, आजचा दुष्ट, वाईट, पतित पापी उद्या चांगला होऊ शकतो. अशी अनेक इतिहासाच्या पृष्ठावर अंकित आहेत. बंकचूल, अर्जुनमाली, चिलातीपुत्र, रोहिणेयचोर अंगुलिमाल, अम्बपाली, वाल्मिकी इ. जी व्यक्ती माध्यस्थ्य भावनाने भावित असते. ती अजातशत्रू होऊन जाते. कारण की, माध्यस्थ्य व्यक्तीचा कोणी शत्रू असूच शकत नाही. ती व्यक्ती सर्वांना समभावाने पाहाते.
अतिदुष्टांबद्दल माध्यस्थ्य भावनेचा प्रयोग
पुष्कळवेळा असे होते की, अतिदुष्ट, दुःसाहसी आणि भौतिक शक्तीने बलशाही व्यक्ती आपले पद, प्रतिष्ठा आणि पैशाच्या जोरावर माध्यस्थ्यशील साधकाचा आत्मीयभाव, प्रेम, वात्सल्य व गुणाग्राही व्यवहाराला बिल्कूल समजत नाही. आणि सतत द्वेष आणि दुर्भावनावरा माध्यस्थ्य भावना समोर टिकू शकत नाही. अशा लोकांशी वागण्याचा एकच मार्ग मौन, उपेक्षा उदासीनता आणि तटस्थता धारण करणे. पण त्यांच्याबद्दल राग-द्वेष वैर विरोध, बदला घेण्याची भावना रतीभर सुद्धा ठेवू नये.
प्रतिहिंसा, बदला घेण्याची भावना उत्पन्न झाली तर त्यामुळे प्रतिपक्ष्याची जेवढी हानी होणार नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने हानी साधकाची होते. माध्यस्थ्य साधक जर द्वेष, रोष करेल तर त्याची आग त्याच्या मनात जळत राहील, त्याचे मन असंतुलित, अस्तव्यस्त आणि विचारशक्ती रहित होऊन जाईल, जी वेडाची किंवा विक्षिप्त स्थिती असू शकते. त्याचे मन अनन्तानुबंधी कषायाने कषायाने ग्रस्त होऊन जाईल, ज्यामुळे तो निन्दनीय कार्य करण्यास तत्पर होतो. त्याचे अधःपतन होते. म्हणून माध्यस्थ्य साधकाने राग-द्वेष, वैरभाव इ. पासून दुरच रहावे.
पर पदार्थाबद्दल सुद्धा माध्यस्थ्य भाव असणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे व्यक्तीबद्दल माध्यस्थ्य भाव ठेवणे श्रेष्ठ आहे, ह्याचप्रमाणे पदार्थाबद्दल ही ठेवणे आवश्यक