________________
(६५२)
आचरण्यासाठी आहेत. म्हणून यास "व्यवहार भावना' ही म्हणतात. योगाची आवश्यक भावना आहे. म्हणून योग भावनेच्या नावाने यांचे विवेचन केले आहे.
जगात या चार भावनांचा व्यापक, विस्तीर्ण प्रसार करण्याची फार आवश्यकता आहे. विश्वशांती, समता आणि समन्वयासाठी या भावना अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.
पंडित आशाधरांनी अणगार धर्मामृतमध्ये पाच महाव्रतांच्या पंचवीस भावनांचे वर्णन केल्यानंतर सर्वात प्रथम या चार भावनांचे वर्णन केले आहे. त्यावरून स्पष्ट होते की पंडित आशाधरांनी यांना फार महत्त्वपूर्ण मानले आहे. ज्याप्रमाणे आज प्रेक्षा, विपश्यना इ. विविध प्रकारे ध्यानाचा अभ्यास केला जातो, त्याबरोबरच भावनांचा जीवनात आत्मसात करण्याची वैज्ञानिक विधीद्वारा प्रयत्न करायला पाहिजे. भावनांच्या आधारावरच ध्यान आधारित आहे. असा अंदाज केला जातो की कधी जैन साधना पद्धतीमध्ये भावनांच्या अभ्यासाच्या काही प्रक्रिया होत्या. ज्याचे विवेचन काही अंशी आमच्या आचार्यांनी, लेखकांनी वरीलप्रमाणे प्रस्तुत केले आहे.
मुनी श्री अरुणविजयजी भावनांना क्रियात्मक रूपात समजावण्यासाठी शिबिराचे आयोजन करीत आहेत. भावनांना क्रियात्मक रूपात जीवनात आचरण्याचा अभ्यास व्हायला पाहिजे. तो अभ्यास वैज्ञानिक विधीनुसार कशाप्रकारे असावा यावर जैन मनीषी, ध्यानयोग आणि चिंतकांनी अवश्य विचार करावा. कारण की, केवळ व्याख्या किंवा विवेचन केल्याने तत्त्वाचा साक्षात्कार होत नाही. तत्त्वाचा साक्षात्कार होण्यासाठी स्वतःला अनुभूती होण्याची आवश्यकता आहे. जी क्रियात्मकतावर आधारित आहे.
मैत्री, प्रमोद, कारुण्य, माध्यस्थ्य इ. या चार भावना मानव जीवनाला स्पर्श करतात. जो मोह, ममता, क्रोध, राग, द्वेष इ. द्वारा त्यास अध:पतित करतात. या भावनांच्या चिंतनाने साधक या दुर्गुणापासून आपल्याला दूर ठेवतो. साधनेच्या मार्गावर अविकृत, अस्वालित रूपात गतिशील राहू शकतो. कारण की, अगोदरच्या प्रसंगाने सूचित केले आहे. ही कर्माच्या विस्ताराचे बी भावनांच्या रूपात प्राप्त होते.
अशाप्रकारे भावनेने भावित होणारा जीव अग्नीप्रमाणे मूळापासून कर्मसमूहाला जाळून टाकतो. मग तो अनुकूल संयोगात हर्ष आणि प्रतिकूल संयोगात शोक करीत नाही. या भावना भवरूपी समुद्राला पार करवणाऱ्या नावे प्रमाणे आहे. अज्ञानाच्या गाट अंधकारातून ज्ञानाची परमज्योती आणि दिव्य ज्योती दिव्य तेज प्रकट करण्यात सक्षम आहे. या भावनांमुळे दोष निवारण होतात. आणि गुणांवर पडलेल्या आवरणाला दूर करून