________________
(६४४)
ज शकत नाही, त्याच्यावर क्रोध करण्यात तरी काय अर्थ ? उगाच आपली शक्ती
नष्ट होते.
आपल्या स्वतःला मनाला व्यग्र, कषायांनी कलुषित आणि हिंसक करून, इसऱ्यांचा उद्धार करण्याचा प्रयोग म्हणजे आपल्या समतावृत्तीला आगीत फेकण्यासारखे आहे. याचे निराकरण करण्यासाठी सर्वोत्तम अहिंसक उपाय आहे- माध्यस्थ भावना.
माध्यस्थ भावना एकांत तटस्थ भावना नाही. तटस्थभावना निरपेक्ष असते. ज्याप्रमाणे नदीकिनारी बसलेली व्यक्ती, नदीच्या प्रवाहात वाहत जाणाऱ्या तृणाला पाहते. पण निरपेक्ष भावाने. परंतु नदीच्या मध्यभागी वाहत जाणाऱ्या माणसाला पाहिले तर तो निरपेक्ष राहू शकत नाही. कोणीही प्राणी असो त्याला वाहताना पाहून माणसाचे मन करुणेने भरणारच, त्याला वाचवायचा प्रयत्न निश्चित करणार. अशावेळी निरपेक्ष राहणे कठीण,
साधक अजून संसारात स्थिर आहे. तो संसारातून अजून मुक्त झाला नाही. म्हणून माध्यस्थ भावनेद्वारे तो विपरीत वृत्तीच्या पापी आणि कुकर्मी यांच्या हिताची कामना करतो. परंतु स्वतःची शांती आणि समता खंडित होऊ देत नाही. हीच माध्यस्थ भावना व तिचे सारतत्व आहे.१०१
राग आणि द्वेष यांच्यामध्ये जे स्थित आहेत, त्यांना मध्यस्थ म्हणतात. कोणत्याही प्रसंगात राग-द्वेष निर्माण होऊ नये यासाठी वारंवार चिंतन करणे माध्यस्थ्य भावना आहे.१०२
“चिन्तनकी चिनगारी" या पुस्तकात लेखकाने माध्यस्थ्य भाव कोणाबद्दल ठेवावेत, त्याचे अनेक प्रकार सांगितले आहेत. उदा.
१) पापीबद्दल माध्यस्थ्य - पापी जीवांना पापापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न केल्यानंतरही जेव्हा ते पापापासून दूर होत नाही तेव्हा अशांच्या बाबतीत माध्यस्थ भाव ठेवला पाहिजे. परंतु मनाला क्रोध इ. कषायांनी कलुषित करू नये. अशा प्रकारे मध्यस्थता ठेवल्याने पापी जीव कदाचित पापात अती आग्रही होण्यापासून परावृत्त होऊ शकतो आणि पुढे भविष्यात सुधारण्याची संभावना निर्माण होऊ शकते.
पाप्याचा तिरस्कार केल्याने तो अधिक द्वेषी बनतो. अशाने वैरभावाची परंपरा जाते. माध्यस्थ भाव ठेवल्याने आपल्याबद्दल त्याचा सद्भाव तरी टिकून राहतो. ज्याप्रमाणे अपथ्य सेवनाने रोगीचा अयोग्य वेळी बचाव करू शकत नाही.