________________
(६४२)
करणाऱ्याबद्दलही क्रोध न करता मौन राहणे, समताभाव ठेवणे, समोरच्या व्यक्तीने केलेला रोध आक्रोश शांततेने सहन करणे, याची खरी समज धैर्य आणि विचार शक्ती असेल साच हे शक्य आहे. माध्यस्थ भावनासाठी दृढ आत्मशक्तीची आवश्यकता असते. अशी विराट शक्ती प्राप्त करण्यासाठी धर्मध्यान आणि आत्मजागृती असणे जरूरीचे असते.९६
"माध्यस्थः समः य आत्मानमिव परं पश्यति" मध्यस्थाचा अर्थ आहे सम. राग आणि द्वेषरहित, आपल्या आत्म्याप्रमाणेच इतरांचा आत्मा मानणे.
'कोणाच्याही बद्दल राग-द्वेष पूर्वक पक्षपात न करणे माध्यस्थ भाव आहे.' संसारात विरोधी तत्त्व आहेत उदा. रात्र आणि दिवस, अंध:कार आणि प्रकाश, थंड आणि उष्ण. कापड उभ्या, आडव्या धाग्यांनी बनते. त्यांची दिशा परस्पर विरोधी असते. इथे उष्णताही खूप आहे तशी बर्फाळ प्रदेशही खूप आहेत. तसेच जगात संतसज्जनांची कमतरता नाही आणि दुष्ट दुर्जनांची ही कमी नाही. अशाप्रकारे संसारात परस्पर विरोधी सत् आणि असत्, शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारची तत्त्वे विद्यमान आहेत. साधकाने राजहंसाप्रमाणे आपल्या माध्यस्थ भावनारूपी चोचीने या तत्त्वांचे पृथक्करण करायला पाहिजे. अनुकूल परिस्थिती वर राग (मोह असक्ती) ही नाही आणि प्रतिकूल म्हणजे विरोधी तत्त्वाबद्दल द्रोह, घृणा, ईर्षा, बैर ही नाही.९७ या जगात मनाला अस्थिर करणारे राग-द्वेष निर्माण करणारे अनेक तत्त्व आहेत. मोहक पदार्थाने मनुष्य त्वरित मोहित होतो. आणि त्याच तत्त्वाने तो दुःखी ही तितक्याच त्वरेने होतो. कारण पदार्थांचा धर्मच आहे- संयोगआणि वियोग होणे. संयोग सुखद वाटतो, वियोग दुःखद वाटतो. म्हणून सुख-दुःखाच्या संकल्प-विकल्पात अस्थिरता आल्याने शांती-मनःस्वास्थ्य लाभत नाही. माध्यस्थ भावात राहण्यानेच शांती मिळू शकते.
मुमुक्षू आत्म्याच्या हृदयात सर्व दुःखी प्राण्यांबद्दल करुणाभाव असतो. तो सर्वांना मोक्षानुरागी पाहू इच्छितो. परंतु जगात असे प्राणी आहेत जे आपल्याच पापोदयामुळे मोक्षमार्गापासून दूर राहतात. अशांना धर्मोपदेश दिला तरी क्रोध इ. कषायांची तीव्रतामुळे त्याच्या कषायांचीच वृद्धी करतात. सापाला दूध पाजले तरी त्याचे विषातच रूपांतर होते. त्याचप्रमाणे अत्यंत पापी, क्रूर आणि निष्ठुर आत्म्यांना दिलेला उपदेश हित करण्याच्या ऐवजी अनर्थाची परंपराच सर्जन करतात.