________________
(६४१)
घटना कधीकधी घटते सुद्धा, की अतिशय दुर्गुणी व्यक्तीमध्ये अचानक परिवर्तन होऊन जाते. कारण त्याच्यात सुषुप्त धर्मसंस्कार जागृत होतात.
चंडकौशिक सर्पाचा दृष्टांत सुप्रसिद्ध आहे. तो अत्यंत विषारी, दृष्टिविप असलेला सर्प होता. बारा कोसापर्यंत त्याच्या दृष्टीचे विष पसरत असे. त्यावेळी समोर असणारे जीव त्याच्या दृष्टीविषाने मरून जात. त्याच्या फुत्काराने जळून जात असत. अशा भयंकर सर्पाला बोध देण्यासाठी भगवान महावीर त्याच्यापाशी गेले. चंडकौशिकाने अत्यंत कुपित होऊन भगवान महावीरांच्या अंगठ्यावर दंश केला. परंतु जराही विचलित न होता भगवानांनी अत्यंत सद्भावनेने मधुर आवाजात त्याला म्हणाले "बुज्झ बुज्झ चंडकौशिक ! असा आपुलकीचा मातृतुल्य वात्सल्यपूर्ण स्वर, त्यांच्या मुखमंडलावर पसरलेली अपार शांती आणि समताभाव आणि अंगठ्यातून मातृत्वाचे प्रतीक श्वेत दूधाची धार याने चंडकौशिक जागृत झाला. त्याचे विषच समाप्त झाले. पूर्वभवातील त्याचे साधुत्व जागृत झाले. पश्चाताप आणि प्रायश्चितरूपी अमृताने त्याचे हृदय स्वच्छ झाले. एका बाजूला समतामूर्ती भ. महावीर होते, दुसऱ्या बाजूला चंडकौशिक. तो या जन्मी दृष्टी विषधारी सर्प झाला पण पूर्व भवामध्ये साधू, तापस होता. त्याच्या पूर्वभवाच्या संस्कारात साधुत्व, त्याग, तपाच्या भावनेचा पाया होता. परंतु अत्यंत क्रोधामुळे त्याची अशी भयंकर अवनती झाली की तो, दृष्टी विष झाला. पण शुभ संयोगामुळे त्याला महान आत्मा भ. महावीरांच्या उपदेशाचा योग मिळाला. त्याचे हृदय परिवर्तन झाले. भ. महावीरांच्या माध्यस्थ भावनेचा विजय झाला. चंडकौशिक सर्पाच्या हृदयात इतके उत्कृष्ट परिवर्तन झाले की आता आपल्या विषामुळे कुणालाही दुःख होऊ नये. हानी होऊ नये. कोणाची हिंसा होऊ नये म्हणून त्याने मुख बिळात लपवले. त्याच्या शरीरावर लागलेल्या मुंग्या मरू नये म्हणून त्याने किंचितही शरीराची हालचाल केली नाही.
चंडकौशिकाच्या ह्या प्रसंगात मैत्री इ. चार योग- भावनाचा समावेश आहे. महावीरांची सर्पाबद्दल असलेली मैत्री भावना, त्याला निम्नस्तरावरून उच्चस्थानी पोहोचवण्यासाठीची करुणा भावना, सर्पाचे झालेले हृदय परिवर्तन पाहून आनंद आणि संतोषाची भावना अर्थात प्रमोदभावना, त्याच्या डोळ्यातून निघणाऱ्या विषाबद्दल समताभावाने स्थिर राहण्याची भ. महावीरांची वात्सल्यपूर्ण मूर्ती ही आहे माध्यस्थ भावना. ह्या उदाहरणाने चारही भावनांचे उत्कृष्ट दर्शन होते.
माध्यस्थ भावना कायरता किंवा निर्बलताची निशानी नव्हे. हितोपदेशाची उपेक्षा