________________
(६३९)
कमब्द आपल्याला सुख देऊ शकत नाहीत दुःखही देऊ शकत नाही. ते तर आपल्या माळे आपण राग द्वेषामुळे त्या विषयांना प्रिय किंवा अप्रिय मानतो. चांगले-वाईट, -अप्रिय सर्वांबद्दल उपेक्षा भाव ठेवणे, कोणालाच मुख्य स्थान न देणे माध्यस्थ भावना
आहे.
अज्ञानामुळे कोणी कुमार्गाने जात असेल त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी आपण उपदेश देतो. अन् तो आपल्या उपदेशाकडे चक्क दुर्लक्ष करतो आणि त्याच दुष्कर्मात सतत प्रवृत्तीशील राहतो. तेव्हा स्वाभाविक आहे की आपल्या मनात त्याच्याबद्दल क्रोध, रोष, आक्रोश भाव येतात, पण असे न करता माध्यस्थ भावना इथे विशेष अपेक्षित आहे. त्याच्यावर रोष करणं व्यर्थ त्यापेक्षा उपेक्षाच अधिक योग्य होईल.
घोड्याला पाणी पाजण्यासाठी नदीच्या पात्रात मध्यभागी नेण्याचे काम करण्याचे तेवढे आपले कर्तव्य आहे. शेवटी पाणी तर तो आपल्या इच्छेनेच पिणार. त्याने पाणी नाही प्यायले तर त्याच्यावर जबरदस्ती तर करता येणार नाही. आणि जबरदस्ती करूनही उपयोग नाहीच. पिण्याची क्रिया त्याला स्वतःलाच करावी लागणार. अगदी तसेच उपदेशाची जो उपेक्षा करतो त्याचीच उपेक्षा आपण करणे अधिक योग्य आहे.
. भ. महावीरांनी स्वतः एक अनुकरणीय आदर्श आपल्या समोर प्रस्तुत केला होता. भ. महावीरांचा शिष्य जमाली-जो त्यांचा जावई होता, भगवानांच्या समोर मिथ्या उपदेश करू लागला. पण भ. नी. त्याला प्रताडित नाही केले. त्याचा द्वेषही नाही केला. जबरदस्तीने त्याला सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न सुद्धा नाही केला. पण त्याची उपेक्षा केली.१४ म्हणजे तिरस्कार नाही, तर त्याच्या आचरणाचा किंचितही परिणाम स्वतःवर होऊ दिला नाही. ही उपेक्षा, तटस्थता, मध्यस्थता, माध्यस्थ भावना, उदासीनता. आपल्याच कर्मबंधनाचे कारण होईल. समोरचा सुधारणार तर नाहीच त्यापेक्षा समभाव ठेवणे उत्तम. माध्यस्थ भावनेचा साधक दुःखाला आमंत्रण देतो आणि मग त्या दुःखात समभाव ठेवून आपल्याला पवित्र करतो. उदा. एकदा कोणी उनाडाने दगड फेकला तो निग्रोनेता डॉ. माटन लूथर किंग यांच्या डोक्याला लागला. डोळे फुटले. रक्त वाहू लागले. जखम धुवून आषध लावले. आणि लूथर ऑफिसमध्ये जाऊन काम करू लागले. कोणाला काहीही बोलले ३. कोणाबद्दल रोष नाही. एका पत्रकाराने त्यांना विचारले, महोदय, तुम्हाला माहित
का उपद्रवी हिंसक रूप धारण करू शकतात, मग आपण तिकडे गेलाच कशाला ? 4 सकट तुम्हाला इतके प्रिय आहेत ? निग्रो नेता म्हणाले- 'माझा विचार होता की