________________
(६३७)
माध्यस्थ शब्द खूप सार्थक आहे. "मध्ये तिष्ठति इति माध्यस्थः, मध्यस्थ्यस्य व माध्यस्त्यं' जो मध्ये असतो. त्यास माध्यस्थ म्हणतात. तात्पर्य हे की जर दोन भक्ती आपसात भांडत असतील तिथे तिसरी व्यक्ती आली आणि त्याने पाहिले की हे दोघे अत्यंत उग्र रूपात भांडत आहेत. मी समजून सांगितले तरी त्यांचे भांडण संपणार नाही. मग तो त्या दोघांपैकी कोणाचीही बाजू न घेता त्या दोघांच्या मधून बाजूला होतो म्हणजे अप्रभावित राहतो. त्यांची उपेक्षा करतो. असे करण्याने त्याच्या आत्म्यात कोणत्याही प्रकारचा क्रोध, मान, माया इ. भाव उत्पन्न होत नाहीत.
_आचार्य हेमचंद्रांनी माध्यस्थ भावनेची चर्चा करताना लिहिले आहे की निःशंकपणे जो थोडा सुद्धा संकोच न करता क्रूरता अथवा निर्दयतापूर्ण कार्य करतो, त्यांच्याकडे विल्कूल लक्ष द्यायचे नाही. आपण आपल्या शुभ विचारात स्थिर रहावे. ही माध्यस्थ भावना आहे.९१ त्यांच्याबद्दल उपेक्षा अशासाठी की अशा लोकांना सुधारणे संभव नाही. म्हणून हेच योग्य की त्यांच्यापासून दूर रहावे. तटस्थ रहावे. याने आपली शांती भंग होत नाही.
उपाध्याय विनयविजयजींनी माध्यस्थ भावनेचे विवेचन असे केले आहे- जिथे परिश्रांत प्राणी विश्राम घेतात. जे प्राप्त करून व्याधीग्रस्त प्राणी अथवा दैहिक अशांतीयुक्त प्राणी प्रेमरसाचा आस्वाद घेतात. प्रसन्न होतात. ज्याने राग-द्वेष शत्रूचा अवरोध होतो. अशी औदासिन्य भावना माध्यस्थभावना आम्हाला फार प्रिय आहे. या संसारात मर्मस्थान भेदन करणारे, भिन्न-भिन्न प्रकारच्या कर्माप्रमाणे भिन्न भिन्न स्वभाव असणारे लोक आपण पाहतो. काही चांगले तर काहिंचे न आवडणारे वागणे असते. माणसाने कोणावर रोष
करावा ?
- पुढे गीतिकामध्ये माध्यस्थ किंवा औदासिन्य भावाचे विवेचन करताना आपल्या स्वतःला संबोधित करून म्हणतात- हे आत्मन ! तू अत्यंत उदार सुखप्रद औदासीन्य भावनेचा अनुभव कर. औदासिन्य भाव अत्यंत कल्याणकारी आहे. समस्त आगमशाखांचे सार आहे. तसेच इष्टप्रद फलप्रद कल्पवृक्ष आहे. तुम्ही दुसऱ्यांची चिंता व विकल्पांना साडून द्या. आपले विकारशून्य शुद्ध स्वरूपाचे चिंतन करा. जो बाभुळाचे झाड लावील त्याला आंबे कसे येणार १९२
__ तुम्ही केलेल्या उपदेशाने किंवा हितप्रद उपदेशाला जो जुमानत नाही, तरी पाच्यावर क्रोध करू नका. इतरांची निरर्थक, निष्फळ चिंता करून तुम्ही आपले सुख नष्ट करत आहात ? ज्या व्यक्तीच्या बाबतीत जे घटित होणार ते तुम्ही मिटवू शकणार