________________
(६३६)
होतो. ज्यामुळे ईर्षा वगैरे दोष नष्ट होण्यास मदत होते. करुणा भावनेमुळे जीवमात्र "आत्मवत्" आपल्या स्वतः समान समजण्याची भावना झाल्यामुळे द्वेष रहातच नाही. परिणामतः कोधादी कवाय कमी होतात.
करुणा आणि दया यांमुळे समाज आणि राष्ट्रा-राष्ट्रांत सुरक्षाही राहते. ज्या समाजातील लोक एक दुसऱ्याबद्दल करुणा भाव ठेवतात तेथे कलहाचे कारणच उरत नाही. करुणेमुळे समाजात स्नेह, एकता, आत्मीयतासारख्या कोमल भावनांचा विकास होतो. वर्तमान जीवनात करुणा असती तर मनस्वास्थ्य सहज प्राप्त होते. आणि परलोकात श्रेष्ठ, सुंदर, उत्तम सुख प्राप्त होते.
करुणा अहिंसेची माता आहे, ज्याने जीवांना रक्षण मिळते. करुणाभावनेमध्ये गुणहीन, बलहीन, साधनाहीन जीवांना पाहून संसाराची करुणाजनक स्थिती पाहून त्या स्थितीचे चिंतन केले जाते. सहानुभूती करुणाचे मुख्य अंग आहे. जी कोमलता, सरलता आणि आत्मानुभूमीच्या आध्यात्मिक ध्येयापर्यंत सहजगत्या पोहोचवते.
सहानुभूती करुणेची बहीण आहे. सहानुभूतीचा आपल्यात विकास झाला तर दया, भद्रता (सरळता) उदारता, अन्तदृष्टी इ. सद्गुणांचा विकास होतो.
माध्यस्थ भावना
मैत्री, प्रमोद, करुणा भावनांनंतर आपल्या स्वतःला सुखी करण्यासाठी या तीन भावनांशिवाय एक अशी भावना अजून आहे जी मनुष्याच्या व्यक्तिमत्वात गरिमा, गंभीरता आणि महत्ता प्रदान करते. शाखकारांनी त्या भावनेस माध्यस्थ भावना म्हटले आहे.
हा संसार मोठा विचित्र आहे. यात अनेक प्रकारचे लोक आहेत. चांगले आणि बाईटसुद्धा चांगल्या प्रवृत्तीचे लोक सत्कार्यात लागतात. बाईट लोक वाईट कृत्यात मस्त असतात. "मी सर्वांना उत्तम आणि भद्र करीन" असा विचार केला तरी ते संभव नाही. काही लोकांना चांगल्या हिताच्या चार गोष्टी सांगावे तर भांडायला उठतात. साधकाने अशा स्थितीत आपल्या स्वतःला तटस्थ ठेवले पाहिजे. विवादास्पद स्थितीपासून दूर रहायला पाहिजे. उदासीन रहायला पाहिजे. यालाच माध्यस्थ भावना म्हणतात. आचार्य शुभचन्द्रांनी माध्यस्थ भावनेचे वर्णन करताना लिहिले आहे की, जो प्राणी क्रोधी असेल, निर्दय तथा क्रूर कर्म करीत असेल, अत्यंत पापी असेल, देव, शास्त्र गुरुजनांची निंदा करणारा असेल, स्वप्रशंसा करणारा, धर्माबद्दल जराही श्रद्धा नसलेला अशा जीवांच्याबद्दल राग-द्वेष सोडून उपेक्षाभाव किंवा औदासिन्य भाव असणे माध्यस्थ भावना आहे. ९०