________________
(६३४)
पता दया, करुणा दाखवतात. शरणी आलेल्यांचे रक्षण करतात. सूर्याचा स्वभाव प्रकाश की आहे. तो परत त्याचे फळ काहीच मागत नाही. त्याचप्रमाणे परोपकार करणे तीर्थंकर
मात्म्याचा स्वभाव आहे. ते भव्य जीवांना सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त करण्याचा सर्वश्रेष्ठ मोक्ष मार्ग दाखवतात.
कर्माच्या अधीन असल्यामुळे संसारातील सर्व प्राणी कष्ट भोगतात. कित्येकांचे अंतरायकर्म प्रबळ असल्यामुळे दीन-हीन होऊन दुःखी बनतात. कित्येकांचे वेदनीय कर्म बलवत्तर असल्यामुळे कुष्ट इ. अनेक रोगांनी ग्रस्त होऊन भयंकर दुःख वेदना भोगतात. कित्येकांना बेड्यांनी बंदिस्त केले जाते. अधिकांश तर अंध, अपंग, मुक, तहान इ. ने कष्ट भोगत आहेत. विकलांग अवस्थेत पीडित आहेत. कित्येक पशू, पक्षी, जलचर, वनचर इ. प्राणी पराधीन होऊन जगत आहेत. अशाप्रकारे अनंत प्राणी विविध आपत्तींमुळे हैरान आहेत. ते मग आपल्या सुखासाठी प्रार्थना करतात- "कोणी दयाळूने आम्हाला सुखी करावे, जीवनदान द्यावे, दुःख, संकटातून वाचवावे.' अशा दुःखी जीवांना सहानुभूती प्रकट करणे, करुणा भावना आहे.८६ ज्याचे हृदय अशा दुःखी, पीडित, असहाय लोकांना पाहून सुद्धा किंचितही पाझरत नाही, त्याला पाषाण हृदयी म्हणावे.८७
कधी-कधी पशूमध्ये करुणाभावना दिसते. उदा. एका परदेशी व्यक्तीजवळ एक कुत्रा होता. तो रोज पिशवी घेऊन बाजारात जात असे आणि मालकाने जे दुकान दाखवले त्याच दुकानातून बारा पाव आणून मालकाला देत असे. काही दिवसांनी मालकाने पाहिले बारा ऐवजी अकराच पाव हा आणतो. तपास केल्यावर कळले की रस्त्यात एक आजारी कुत्रा ह्या कुत्र्याला दिसला तो कुत्रा चालू फिरू शकत नव्हता. तो रोज त्याला एक पाव देत असे म्हणून अकराच पाव (ब्रेड) पिशवीत असत.८८
___ करुणाभावना अहिंसेचे विधायक रूप आहे. दुःखी व्यक्तीला पाहून आपले हृदय कळवळायला पाहिजे, करुणेने भरले पाहिजे हाच जीवनातील खरा चमत्कार आहे. उपदेश कल्याने, ऐकल्याने करुणा येत नसते. ती आचरणात असायला हवी. करुणाशील जीवन खरा जीवंतपणा आहे. अनुकंपा असलेल्या हृदयात अस्तिकता असते. अनुकंपा. करुणा हा बीजे हृदयात पेरल्याशिवाय धर्मक्रियांचे फळ मिळूच शकणार नाही. मला स्वतःला लवकरात लवकर मोक्षाचे सुख मिळू देत अशा भावनेन सतत राहणारा मुमुक्षू तत्त्वाच्या टाने तो "मोक्ष मिळू देत" हे सतत घोकत राहिल्याने तो आर्तध्यानात फसतो. ही फार म विचारसरणी आहे. प्रत्येक धार्मिक म्हणवणाऱ्या व्यक्तीने याचे सखोल, सक्षमतेने