________________
(६३३)
देणारी तथा अनंत दुःखाचा नाश करणारी आहे. ८४
इतकेच नव्हे तर या दया तत्त्वाला अधिक व्यापक स्वरूप आणि गरिमा देण्याच्या हेतूने, गृहस्थ काही काळापर्यंत साधू समान साधना करतात. त्या साधनेला 'दया' म्हटले आहे. अशा प्रकारचे दया साधनाचा अभ्यास करणाऱ्या साधकाला त्या काळापुरते अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह व्रतांचे पालन करायचे असते. स्वाध्याय, सामायिक, ध्यान इ. करतात. हे सर्व धार्मिक कृत 'दया' मध्ये समाविष्ट आहेत.
दया म्हणजे कोणतीही पीडा भोगत असलेल्यांना त्या पासून मुक्त करण्याचा प्रयत्न करणे. हा साधनात्मक अभ्यास अहिंसा आणि दया या शिवाय संवेग, निर्वेद तथा वैराग्यमूलक सद्वृत्ती त्यात समाविष्ट आहेत. त्यांनाही 'दया' म्हटले आहे. म्हणून दया, करुणा यांना सर्वाधिक गौरव, महत्त्व दिले गेले आहे.
जेव्हा कोणतीही एक गोष्ट सदृढ रूपात स्थापित करायची असते, तिला स्थायित्व द्यायचे असते तेव्हा त्याच एका गोष्टीला सर्व तऱ्हेने बळ देणे आवश्यक होऊन जाते. भार देऊन ती सांगावी लागते ज्यामुळे तेच तत्त्व स्मृतीमध्ये ठसून राहते. प्राचीन ज्ञानीजनांच्या मनात 'दया' बाबतीत असेच विचार आले असावेत. त्याकाळी 'दये'ला इतके महत्त्व दिले जात नसावे हे शक्य आहे म्हणून कदाचित परंपरापासून प्रचलित धर्माचा शिष्टाचाररूप सुआशिर्वाद रूप बचन 'दया पालो' रूपात परिवर्तित केला गेला
-
असावा.
वृत्ती बदलण्यासाठी भावनेला फार महत्त्व आहे. क्रूरता, निर्दयता, निशंसता व परदुःखकातरता यासारखी आंतरिक दूषित वृत्ती दया भावनेने सतत अणुभावित, अनुप्रेरित राहण्याने क्रूरता, निर्दयता, नृशंसता, दया भावना जनतेच्या रंगा रंगात पोहोचण्यासाठी धार्मिक आशीर्वचनामध्ये असे परिवर्तन केले जाणे वास्तविक त्या महापुरुषांचे एक प्रशंसनीय क्रांतिपूर्ण पाऊल होते.
साधू सर्वांच्या दयाचे चिंतन करतात. साधूमध्ये उपाध्याय, उपाध्यायातून आचार्य बनतात. तेव्हा 'दये'ची वृद्धी होते. आणि आचार्य पद आणि पदवी मिळाल्याने दया अनेक पटीने वाढली तर आचार्यातून अरिहंत झाल्यावर अनन्त पटीत दया वाढते. अरिहंत वीतराग परमात्मा करुणासिन्धू, दीनबंधू, जगत्दयाळ इ. अनेक विशेषणांनी विभूषित
केले
जातात. म्हणून 'शांतसुधारसत' उपाध्याय विनयविजयजी म्हणतात हे सज्जनांनो ! परमेश्वराला प्रेमाने भजा ! ते परमात्मा शरणी आलेल्यांना कोणत्याही प्रकारची अपेक्षा न