________________
यावरून एक प्रश्न उपस्थित होतो की, शाकाहारी लोक एकेन्द्रिय जीवांचा उपयोग तात. त्यांची तर किती मोठ्या प्रमाणात हत्या होते. त्याला गौण कसे मानावे ? केन्द्रियप्राणी लहान (सूक्ष्म) आहेत. त्यांची अविकसित अवस्था आहे, तरीही त्यांना आपला जीव प्रियच आहे. त्यांना आपली भूक भागवण्यासाठी मारणे कितपत योग्य आहे 7 एका वेळच्या जेवणासाठी पहा किती मोठ्या संख्येत त्यांना नष्ट केले जाते. शेवटी जीव तो सर्वांचा सारखाच ना ? मग ऐकन्द्रिय असो की पंचेन्द्रिय ? यावर विशेष चिंतन करण्याची आवश्यकता आहे. प्राणाच्या दृष्टीने सर्व प्राणी एक आहेत. किंतु देह, इंद्रिय इ. दृष्टीने त्यांच्यात फरक आहे. त्याला नगण्य समजू नये. मांस खाण्यासाठी जेव्हा माणूस उद्युक्त होतो तेव्हा त्याच्यात हिंसेची तीव्र भावना नसते. भावना फार क्रूर झालेली असते. तेव्हा तो मांस खाण्याच्या हेतूने प्राणिवध करतो. जरी स्वतः हत्या केली नाही तरी तो ते विकत तर घेतोच ती हिंसा त्याला लागणारच. तात्पर्य एवढेच की. पंचेन्द्रिय प्राण्याला मारण्यासाठी प्रथम अति निम्न कोटीचे हिंसक भाव मनात उत्पन्न होतात. या भावनेनेच मुळी आत्म्याचे पतन होते. एक शाकाहारी व्यक्ती जेव्हा शाकाहाराची सामग्री गोळा करतो तेव्हा मी घोर हिंसा करीत आहे, असे मनात दूषित भाव किंवा कुत्सित संकल्प नसतो. म्हणून अन्नहार किंवा शाकाहाराची तयारीमध्ये आरंभजा हिंसा म्हटले आहे. जी गृहस्थाश्रमात अनिवार्य आहे.
___ परंतु मांसाहार किंवा मांसाहाराची तयारीच अत्यंत घोर दुष्ट, जघन्य परिणामाने व्याप्त आहे. ती संकल्पना हिंसा आहे. म्हणून शास्त्रामध्ये नरकबंधाचे कारण सांगितले आहे. अशी हिंसा तथा हिंसाजनक कार्यापासून अलिप्त निवृत्त राहण्याचा एक मात्र हेतू कारुण्य भावना आहे.
मैत्री भावना कारुण्य भावनेला आधार देणारी आहे. जर मनात सर्व प्राणिमात्रांबद्दल मित्रतेची भावना असेल, निर्वैर वृत्ती असेल तर सहजपणे त्यांच्याबद्दल करुणा, दया, अनुकंपाचे भाव जागृत होतात. मैत्री भावना जीवनात प्रगाढ असेल तर प्रतिस्पर्धा आणि घा भाव समाप्त होऊन जातात. याने सुद्धा अहिंसक वृत्तियांना खूप बळ मिळते. करुणा किंवा दया भावनाच्या प्रसाराचे क्रांतीपूर्ण पाऊल
अधिकांश जैन संप्रदायांच्या साधु-साध्वींना जेव्हा गृहस्थ वंदन करतात तेव्हा प्रायः ह्यांना आशीर्वादरूपात 'धर्मलाभ' या शब्दाचा प्रयोग करतात. याचा अर्थ असा वदन करणाऱ्यांना हा धार्मिक शिष्टाचारपूर्ण व्यवहार योग्य आहे. सर्वस्व त्यागी साधूंना