________________
मांसाहारात प्राणीघाताच्या दृष्टीनेच फक्त हिंसा होते असे नाही तर त्याबरोबर
जीवांची ही हत्या होत असते. दिगंबर जैन परंपरामध्ये सुप्रसिद्ध आचार्य तीजमतचन्द्राचार्य "पुरुषार्थ सिद्धी' ग्रंथात मांसाहाराचे हेयता प्रकट करताना लिहितात
यांचा वध केल्याशिवाय मांस मिळत नाही. म्हणून मांसभोजीजीवाला अनिवार्यरूपेण हिंसा करण्याचे पाप लागतेच.७९
एकेन्द्रिय वनस्पतीजन्य, या भौमिक प्राण्यांमध्ये मांस नसते. मांस द्विइंद्रियांपासून पंचेन्द्रिय प्राण्यांच्या शरीरात असते. अर्थात त्यांच्या शरीरातील तो भाग प्राप्त करण्यासाठी त्यांना मारावे लागते. हिंसा करावी लागते. काही लोक व्यर्थ तर्क करतात-की- जे प्राणी आपल्या मृत्यूने स्वतःच मेले आहेत त्यांचे मांस खाण्यात कशी हिंसा होईल ? हिंसेच पाप कसे लागेल ?
यासंबंधी आचार्य अमृतचंद्र म्हणतात, हे जरी खरे असले की, म्हैस, बैल इ. प्राणी आपल्या मृत्यूने मरतात. त्यांचे मांस बिना हिंसा केल्याने ते प्राप्त होते. परंतु ते अखाद्य आहे. कारण स्वाभाविक वृत्तीने मृत्यू पावलेले म्हैस, बैल इ. जीवांच्या मृतशरीरात त्याच जातीचे अनंत सूक्ष्म समुर्छिम जीव उत्पन्न होतात, तथा अनंत निगोद जीवांची सतत उत्पत्ती होत असते. म्हणून नैसर्गिक मृत्यू पावलेल्या प्राण्याचे मांस खाल्याने सुद्धा त्यात उत्पन्न अनंत सूक्ष्म जीवांचा घात होतो. ही सुद्धा हिंसाच आहे. निश्चितपणे हिंसा आहे. म्हणून अशा मांसाहाराचा निरोध केला गेला आहे.८०
ज्याप्रमाणे स्वतः मृत पशूच्या मांसात अनंत सूक्ष्मजीव सतत उत्पन्न होत असतात, तीच स्थिती त्या मांसासंबंधी आहे. तो कच्चा असो अथवा शिवजलेला. सांगण्याचा उद्देश एवढाच की, मांस कोणत्याही अवरथेतील असो त्यात अनंत सूक्ष्म निगोदिक जीव उत्पन्न होतच राहतात.
यावरून स्पष्ट होते की, शिजवलेले मांस सुद्धा निर्जीव असूच शकत नाही. त्यात सुद्धा पापच आहे. जो माणूस शिजवलेल्या मांसाचे सेवन करतो तो तर त्यांच्या मृत्यूचा यमतुल्य खराच. पण जो अशा मांसाला स्पर्श करतो त्यावेळी त्यात उत्पन्न होत असलेले अनेक जीव समूहाच्या पिंडाचा घात करण्याच्या पापात पडतो. स्पर्श करणारा सुद्धा तितकाच पापी आहे. म्हणन हिंसाचायपासून वाचण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या मांसाचा सर्वथा त्याग आवश्यक आहे.८२