________________
(६२७)
की याचा गर्व, अहंकार करू नये की "मी मदत करतो.' उलट असा विचार या की त्या दुःखी, पीडित, व्यक्तीचे पुण्य प्रबल म्हणून दुःख निवारण करण्यात मी निमित्त बनलो. असा विचार पुण्य प्रदान करणारा आहे. त्याचे फळ ही मधुर मिळते.
सम्यग्दृष्टी संपन्न साधकाने असा कदापि विचार करू नये की “हे प्राणी आपआपल्या केलेल्या कर्माचे फळ भोगताहेत. त्यांनी अज्ञान व मोहामुळे दुसन्यांना दुःख दिले. या दुष्कर्माचे फळ हे असे त्यांना भोगलेच पाहिजे. आपण तर त्यांना दुःख, त्रास दिला नाही. मग आपण कशाला त्यांचे दुःख निवारण करण्याच्या भानगडीत पडायचे? त्यांनी केलेल्या कर्माची फळे ते भोगत आहे आपण त्याच्यात बाधक कशाला व्हायचे ? कोणी हृदयहीन व्यक्तीच असा विचार करतील.
_आपण काही पूर्ण ज्ञानी (केवलज्ञानी) नाही की हे जीव कोणत्या कर्माची फळे भोगत आहेत? असे ही शक्य आहे की त्यांनी केलेल्या कर्माची फळे त्यांना, आपल्या सहानुभूतीने, सहृदयतेने, करुणेने आणि अनुकम्पाच्या रूपात सांत्वना किंवा आश्वासन रूपात भोगायचे आहे. जर आपल्या कडून करुणा इ.मुळे आश्वस्त होऊन कदाचित ते समभावपूर्वक कर्मफळ भोगतील. त्यांचा प्रसन्नातापूर्वक कर्मफळ भोगण्याचा विचार असेल तर त्यात आपले काय जाते ? म्हणून उदारतापूर्वक पीडितांच्याबद्दल करुणाभावना व्यक्त करायला पाहिजे.
सम्यग्दर्शनाची धडकन जाणण्याचे करुणा हे एक थर्मामीटर आहे. पू. घासीलालजी महाराजांनी करुणेचे विवेचन आध्यात्मिक पद्धतीने केले आहे"मिथ्यादर्शन व अनन्तानुबंधी इ. महा मोहाने जे ग्रस्त आहेत, कुमती, कुश्रुती व विभगज्ञानाने जे युक्त आहेत, जो इष्ट प्राप्ती आणि अनिष्ट परिहार रहित आहेत. अनेक दुःखाने पीडित आहेत. दीन, दरिद्र, अनाथ, बालवृद्ध आहेत. त्यांच्याबद्दल अविच्छिन्न करुणाभावना धारण करावी. करुणाभावना करून त्यांना पाणी, वस्त्र, स्थान, औषध इ. देऊन अनुग्रहित करावे.७७
पू. घासीलालजी महाराजांनी दोन प्रकारच्या करुणांचे वर्णन केले आहे. मिथ्यादर्शन अनि
यादर्शन आणि अनंतानुबंधी महामोह व तीन अज्ञानाने युक्त जीवांवर भावकरुणा आणि न्य बाह्य वस्तूंच्या अभावी पीडितांवर द्रव्य करुणाचे वर्णन केले आहे.
भगवान महावीरांनी चंडकौशिक सारख्या विषारी सर्पाला भावकरुणेने सद्गतीगामी ल. संगमदेवासारख्या शत्रूला स्नेहमय अश्रुबिंदूंनी सन्मानित केले. गोशालक सारख्या