________________
SHTAMARHI
मांसाहाराशी कोण्या जीवाचा प्राणातिपात अथवा बध तर आहेच. किंतु अजून महत्त्वपूर्ण तथ्य ज्ञातव्य आहे. मांस से बनाने क्रोध, उत्तेजना, उद्वेग आणि सामवासनासारख्या कलुषित, कुत्सित, मनोवृत्ती उत्पन्न होतात. ज्यामुळे मानव अनेक प्रकारच्या पाप कार्यात निःसंकोच भाग घेतो. मांसाहारीमध्ये निर्दयता, नृशंसता आणि निष्करुणा तीव्रतम रूपात असते. जशी व्यक्तीला कोणाचेही प्राण घेण्यात जराही संकोच वाटत नाही. मांसाहार हा नितांत तामसिक आहार आहे. त्याच्या सेवनाने सद्-असद विवेकाचे भानच रहात नाही. मदिरापान, धन प्राप्त करण्यासाठी अदत्तादान (चोरी) इ. वृत्तींचा त्याच्या प्रार्दुभाव होतो. तो विवेक भ्रष्ट होऊन जातो. म्हटले आहे- “विवेक भ्रष्टाणां भवति विनिपातः शतमुखः- जो विवेकहीन होतो त्याचे पतन शतमुखाने होते. त्याच्यात शेकडो पापपूर्ण दुर्वृत्ती ठाण मांडून राहतात. वर सांगितल्याप्रमाणे ज्या व्यक्तीत कल्णाभावना असेल तो आपले पोट भरण्यासाठी, जीभेच्या स्वादासाठी मांसभक्षणसारखे जघन्य कार्य कदापि करणार नाही. कारण की खाणे, स्वाद घेणे ही काही जीवनाचे ध्येय नव्हे. ही तर लोलुपता आहे. आणि हीच आत्मदुर्बलता आहे.
भोजनाचे लक्ष्य विलासिता, स्वाद किंवा दैहिक तुष्टी नाही. ते तर केवळ दैहिक जीवन निर्वाहाचे साधन आहे. म्हणून वास्तविक शरीराला जेवढी गरज आहे, शरीर स्वस्थ रहावे यासाठी जेवढे आवश्यक आहे तेवढे तेही सात्त्विक, अविकारोत्पादक असा आहार सेवन करणे योग्य होय. कारण मनुष्यजीवन बहुमूल्य आहे. महत्प्रयासाने ते मिळाले आहे. जीवनासाठी भोजन आहे. भोजनासाठी जीवन नाही. ज्या भोजनामुळे इहलोक परलोक बिघडणार असतील तर काय उपयोग | विकार निर्माण करणारे भोजन तर साधकाला सर्वथा त्याज्य आहे.
स्वादच भोजन करण्याचे लक्ष नसावे, तसे पण समजा, स्वादाचाच विचार केला तरा शाकाहारात आंबट, गोड, कडू, तिखट इत्यादी कितीतरी स्वादिष्ट पदार्थ, मनोज्ञ पदार्थ बनवू शकतो. तसे मांसाहारात इतके पदार्थ सुद्धा करता येणार नाहीत. या संदर्भात शास्त्रात लिहिले आहे -
सब्बे जीवावि इच्छांति जीविउं न मरिजिउं ।
तुम्हा पाणिवहं घोरं निग्गंया बज्जयंति णं ॥८३ जगातील सर्व जीव जगू इच्छितात. कोणालाही मरण नको असते. म्हणून कधीही
हिंसा करू नये.