________________
(६३८)
नाही म्हणून तुम्ही समतापूर्वक रहा. अनुकूल, प्रतिकूल, मनोज्ञ, अमनोज्ञ सर्वांच्याबद्दल समानभाव ठेवा. व्यर्थ मायाजालापासून दूर रहा. निरर्थक प्रपंचात पडू नका. ९३
उपाध्यायजींनी काव्यात्मक शैलीत जे वर्णन केले आहे त्याचा सारांश असा आहे- संसारातील लोक, ज्यांनी विविध प्रकारची कर्मे केली त्याच्या फलानुसार भिन्नभिन्न प्रवृत्तीत व्यग्र असतात. जसे कर्म केले असतील तशीच वृत्ती बनते. त्याला तो कर्म करणाराच जबाबदार आहे. दुसरा कोणी काही करीत नाही. असा विचार केला नाही तर व्यर्थ त्यांच्या ग्रंपचात्मक कार्यात पडून आपण विनाकारण दुःखी होतो. म्हणून साधकाने अशावेळी उदासीन मध्यस्थता किंवा तटस्थता भाव आपल्या मनात जोपासावा. आपले कर्मबंध होणार नाहीत याचीच चिंता करावी. आपल्या आत्मकल्याणात रत रहावे. अशी व्यक्ती सदा सुखी राहते. इतरांच्या झंझटात निष्कारण अडकू नये व दुःखी होऊ नये.
__ कोणी आपल्याशी विपरीत वागत असेल, बोलत असेल किंवा खोटेपणाने वागत असेल तर समजपूर्वक त्याचा आपल्या मनावर परिणाम होऊ देऊ नये. अप्रभावित रहावे. खरं म्हणजे असे अविचलित राहणे फारच कठीण आहे. कारण प्रत्येकात व्यक्त किंवा अव्यक्त रूपात अहंकार भरलेला असतो. थोडाजरी प्रतिकूल व्यवहार कोणी केला लगेच अहं उदिप्त होतो. परिणाम असा होतो की- परस्पर संघर्ष किंवा कलहाची स्थिती उभी राहते. म्हणून शाखात अशा स्थितीमध्ये मध्यस्थ, तटस्थ किंवा उदासीन राहण्याचा निर्देश करण्यात आला आहे. तटस्थ राहिल्याने वातावरण कधीच विकत होत नाही. आपली शांतीही भंग होत नाही. मन उच्च चिंतन, मननात राहते. असे करणे इतके सोपे नाही. तरीही मनात दृढ आणि स्थिर केल्यास असंभव नाही. प्रयत्नाने असंभव काम सुद्धा संभव होऊ शकते.
___ आपल्या मनातील राग-द्वेषात्मक भावनाच आपल्या सुख-दुःखाचे कारण बनतात. हा राग (मोह) सुद्धा तात्कालिक रूपात क्षणिक सुखाचा आभास मात्र आहे. राग-द्वेषच मुळा दुःखाला कारणीभूत आहेत. यांच्यावर विजय मिळवणे म्हणजे दुःखावर विजय मिळवणे आहे. विषयांचा राग-द्वेष न करता तटस्थ रहाणे हाच उपाय आहे.
इंद्रियांचा स्वभाव आहे की आपआपल्या स्वभावात व्यस्त राहण्याचा कान एकतात, डोळे पाहतात, जीभ स्वाद घेते वगैरे. इंद्रियांच्या या विषयात अशुभ आणि शुभ, सुंदर आणि असंदर सर्वप्रकारच्या स्थिती असतात. कानाला एखादा स्वर आवडतो एखादा न आवडणारा असतो. स्वर किंवा शब्द तर स्वत: प्रिय किंवा अप्रिय नाहीत.