________________
वंदन अगदी योग्य आहे. त्यांचे संपूर्ण जीवनच मुळी धर्ममय आहे. धर्म हा त्यांच्या जीवनाचा सर्वोच्च आदर्श आहे. ते 'धर्मलाभ' अशी इच्छा करतात ते सर्वथा योग्यच आहे.
श्वेताम्बर परंपरामध्ये स्थानकवासी आणि तेरापंथी दोन असे संप्रदाय आहेत की त्यांचे साधु-साध्वी 'धर्मलाभ' न म्हणता “दया पालो' अशी शुभकामना करतात. तेरापंथी जेझ्याजी' म्हणतात. आशय असा की त्यांच्यानुसार जिताचार धर्म भावना युक्त शिष्टाचार
वताम्बर पर
आहे.
स्थानकवासी परंपरेमध्ये 'दयापालो' हे वचन कशा प्रकारे आले याची चर्चा आजही होते. हा विषय खरोखर विचारणीय व अन्वेषणीय आहे. 'धर्मलाभ' म्हटले जातेतिथे धर्माचे सर्व उत्तमोत्तम तथ्य येऊन जातात. परंतु 'दया पालो' या वचनात दया म्हणजे अनुकंपा रूप धर्माचे एक अंग होते. पण काय दयाच फक्त एकमात्र धर्म आहे ? फक्त दया केल्यानेच जीव आपल्या परम ध्येयाला मोक्षाला प्राप्त होतो अशा अनेक शंका इथे उत्पन्न होऊ शकतात. 'दया पालो' असे म्हणण्यामागे काही विशेष कारण असले पाहिजे. यावर थोडा विचार करू या.
स्थानकवासी परंपरा जेव्हा सुरू झाली तेव्हा धार्मिक जगात दया, अनुकंपा, करुणा ह्याप्रवृत्ती फार कमी प्रमाणात लोकांच्यात होत्या. लोक बाह्य पूजा, अर्चना इ. कर्मकांडात अतिशय मग्न होते. कर्म काण्डात जास्तीत जास्त राहू लागले. धर्माच्या ज्या सत्प्रवृत्ती होत्या त्यांची तर उपेक्षाच करू लागले. त्यांच्यातून दया भाव ओसरू लागला असावा. दया, करुणा म्हणजे सर्वस्व धर्म नाही. तरीही धर्माचा प्रमुख, महत्त्वपूर्ण अंग जरूर आहे.
म धर्माचा प्रासाद सम्यक्त्वाच्या पृष्ठभूमीवर म्हणजे मूलाधारवर आधारित आहे. जर सम्यकत्व नसेल तर ज्ञानही सिद्ध होत नाही आणि धर्मही सिद्ध होत नाही. सम्यक्त्वीची पाच लक्षणे सांगितली आहेत. त्यातील एक अनुकंपा आहे. जीवनात जर अनुकंपा किंवा दया नसेल तर सम्यक्त्व सिद्ध होत नाही.
अंतःकरणात दया किंवा करुणा असेल तर सहजपणे धर्मानुराग जागृत होतो. दयाळू माणूस कोणाचीही कधीच हिंसा करणार नाही. कोणाशीही क्रूरतापूर्ण व्यवहार करणार
हा. कोणावर अन्याय करणार नाही. त्याच्या आचरणात कर्कशता, कटुता नसते. तात्पर्य ९ का, मनुष्यामध्ये दया, करुणा गुण असेल तर त्या आधाराने अन्य कितीतरी गुण आपोआप येतात, गुणामध्ये भर पडते.
धर्मरूपी कल्पवृक्षाचे बीज ‘दया' आहे. ती जगातील सर्व सुख उपलब्ध करुण