________________
न करायला पाहिजे. 'मोक्ष पाहिजे' म्हणण्याने काही मोक्ष मिळत नसतो. दुसऱ्याच्या खात सहभागी झाल्याशिवाय स्वतःचे दुःख टळावे या इच्छेने अहिंसा, क्षमा, तप, जप बम प्रवृत्ती केली जात असेल. परंतु या स्वार्थान उत्पन्न प्रवृत्ती मोहजन्य झाल्या. मोहाचीच पणी केली. मैत्री, करुणा यांचा जितका विकास तितक्या प्रमाणात मोक्षपंथाचा मार्ग पार केला म्हणायचा आणि मैत्री करुणा भावना जितक्या कमी प्रमाणात तितका मोक्षमार्ग दूर.
करुणा, सर्व संसारी जीवांचे कल्याण चिंतणारी भावना आहे. संसारात करुणाचे इतके प्रसंग येतात की त्याचा पार नाही. संसारात आधिव्याधी आणि उपाधींनी त्रस्त जीव करुणा करण्यास पात्र आहेत. करुणा जीवाश्रित आहे, जडाश्रित नाही. करुणा सुखद-खाच्या निमित्ताने आत्मशुद्धी आणि सिद्धी पण देते. करुणा भावना शांती आणि साता (सुख) देते. या भावनेमुळे स्व आणि पर उभयमुखी शांती मिळते. करुणा कपायांना मंद करून आत्म्याला भावुक नम्र तसेच शांतही करते. जगात केवळ देहाने पीडित किंवा रोगी यांच्याबद्दलच करुणा करावी असे नाही तर दीर्घदृष्टी योगी तर या जगात कषाय (क्रोध, मान, माया, लोभ) करणारे, पापकर्म बांधणारे जीव ज्यांना कषाय इत्यादींच्या परिणामांचे फळ भोगावे लागणार आहेत त्यांच्यावर सुद्धा करुणा भावना करतात. ज्ञानी लोकांची करुणा इतक्या विस्तृत स्वरूपात असते. ज्ञानी जीवमात्राबद्दल करुणाचे चिंतन करतात. यास भावकरुणा म्हणतात.
बाहेर कुठे मारामारी करून आपला मुलगा जख्मी होऊन आला तर कर्तव्यशील माता-पिता लगेच त्याची मलमपट्टी करून, औषध देऊन, त्याला बरे करण्याचे प्रयत्न करतात. त्याची खूप काळजी घेतात. यापेक्षा जास्त काय करणार ? परंतु एका ज्ञानी महात्म्याच्या दृष्टीने, करुणा भावनेने त्यांना विचार येतो की, या प्रवृत्तीमुळे त्याने किती कर्म गोळा केले असतील ? हा पुढे किती दुःखी होईल (कर्मामुळे) किती जन्ममरण याला करावे लागतील ? या कर्मापासून तो कधी मुक्त होईल, असे आत्म्यासंबंधी अपार कारणभाव त्यांना येतात. हीच ती खरी भाव दया, हेच खरे भावकरुणा चिंतन.८९
मैत्री आणि करुणा दोन्ही भावना काही अंशी समान वाटतात. परंतु मैत्री भावनमध्ये प्रेमाने रागा (मोह) वर विजय मिळवता येतो. आणि करुणा भावनेमध्ये दयेद्वारा द्वषावर विजय मिळवता येतो. ह्या दोन्ही भावना कषाय जिंकण्यासाठी उपकारक आहेत. ना भावनेबरोबर करुणा भावनेचा घनिष्ठ संबंध आहे. ह्या दोन्ही भावना म्हणजे आपला जव्या व डाव्या डोळ्यासारख्या आहेत. मैत्री भावनेमुळे प्रेम विश्वव्यापी होते. राग दूर
RRIORANDOMAINANCIAANAANAyurveyieswagenMAMANTRIcomwhaashatisvavioojananapitavaasnasterministramdisennistmaimsanihinadiadiovision