________________
(६२६ )
त्यांची खरी माता करुणामाता होती. "मी संपूर्ण विश्वाचे मंगल करून जीवसृष्टीला शिवस्वरूप बनवून दुःख आणि पापापासून मुक्त करीन अशा महाकरुणा भावनाने त्यांना तीर्थंकर भगवान 'महावीर' केले. आजच्या युगात अशी करुणा दिसणे दुरापास्तच आहे. डोळ्यात ईर्षाचा अग्नी, तिरस्कार, क्रोध आणि अभिमानामुळे श्रीमंत गरीबाचा तिरस्कार करतात. समाधीश नागरिकांशी असभ्यपणाने वागतात. कोणी कोणाचे ऐकायलाच तयार नाही.
पूर्वी करुणाशील हृदय असणारे लोक मुंगी पासून ते मोठ्या जनावरांपर्यंत सर्वांचे रक्षक होते. गरीबांसाठी गुप्तदान देत असत. ह्यामुळे प्रत्येकाच्या मनात संतोष होता. लूटालूट करण्याचा विचारसुद्धा कोणाच्या मनात येत नसे. आजच्या भीषण वातावरणात दया, करुणा, याची अत्यंत आवश्यकता आहे.
शरीरात जे स्थान हृदयाला आहे. तसेच स्थान साधनाच्या क्षेत्रात करुणाचे आहे. जर हृदयाचे ठोके थांबले तर हार्टफेल झालेच म्हणून समजायचे. त्याचप्रमाणे साधनेच्या क्षेत्रात करुणाभावाची गती मंद झाली तर साधनेमध्ये समताभावाचे आस्तित्व समाप्त होण्यास विलंब लागणार नाही.
क्लिष्टेषु जीवेषु कृपा परत्वम् ७६
"माझा आत्मा पीडित जीवांवर सदैव करुणाभावाने भरलेला असो" करुणाभावना आत्मौपम्य दृष्टी असेल तरच होऊ शकते.
संसारात सर्वांना सर्वत्र सुख, शांती, निरोगता, धनसंपन्नता सुव्यवस्था इ. सर्वप्रकारचे सुख साधन उपलब्ध असतील हे या काळात तरी शक्यच नाही. प्रत्येकाच्या मागे कोणते ना कोणते दु:ख, मागे लागलेलेच आहे. मग ज्याचे हृदय करुणेने भरलेले आहे तो या समाजातील संसारातील दुःखी, पीडित, व्यथित लोकांना पाहून निष्क्रिय, निस्पन्द राहील हे अस्वाभाविक आहे. अशांच्यासाठी काहीच न करणे हे पाषाण हृदयाचे लक्षण आहे. अमानवीयता आहे. पीडितांसाठी हमदर्द होऊन सहृदयतापूर्वक करुणार्द्र व्हावे हे आद्य कर्तव्य आहे. पीडितांची उपेक्षा करणे म्हणजे असे हृदय जे वाळवंट आहे, त्यात करुणेचा अंश मात्र सुद्धा नाही, प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे की जर तो स्वःत सशक्त आहे, विचारशील आहे तर त्याने दुःखी जीवांबद्दल सहृदयता पूर्वक विचार करावा आणि करुणार्द्र होऊन यथा शक्ती त्यांची सेवा करावी.
भूकंप, अतिवृष्टी, अनावृष्टी, दुष्काळ, महामारी इ. मुळे आपदग्रस्त झालेल्या लोकांची सहायता करावी. दु:खी लोकांचे दुःख दूर करावे. पण त्याबरोबर हे ही लक्षात