________________
SHA
(६२४)
जगाच्या उद्वेगपूर्ण स्थितीचे आकलन करताना उपाध्यायजींनी पाठकांना आपल्या जीवनात उत्तम धार्मिक भाव रुजविण्याची आणि मनाला करुणाशील बनवण्याची विटोप
प्रेरणा दिली आहे.
Rel
ज्या माणसाच्या हृदयात करुणा नाही तो खरं म्हणजे माणूस म्हणवून घेण्याच्या पात्रतेचा नाही. आपले दुःख दूर करण्याचा सर्व प्रयत्न करतातच यात विशेष ते काय ? विशेषता तर त्यात आहे जी व्यक्ती दुसऱ्यांचे दुःख, पीडा, संकट निवारण करण्याचा प्रयत्न करते. त्या माणसाचे, माणूस म्हणून जन्म घेणे सार्थक आहे.
करुणा भावनेमुळे वातावरणात सहानुभूती आणि सहयोगाचे तत्त्व विकीर्ण होतात. ज्या व्यक्तीचे संकट दूर करण्यास प्रयत्न केला जातो त्या व्यक्तीच्या मनात सुद्धा अशी भावना जागते की माझ्यासारख्या अनोळखी माणसाबद्दल यांची किती उच्च भावना आहे. तो सुद्धा मग मनातल्या मनात विचार करतो मी सुद्धा कधी अशाच प्रकारे दुसऱ्यांना संकटातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करीन.
_ जो आज आपल्याला अतिशय सुखी, आनंदी, समर्थ दिसतो तो सदैव तसाच राहिल असे नाही. त्याच्या जीवनातही कधी अशी वेळ येते. कठीण प्रसंग येऊन शकतात तेव्हा त्याला कोणाच्यातरी मदतीची आवश्यकता पडते. त्यावेळी त्याला ही कोणी सहायक मिळू शकतो. ज्याचे त्याने कधी कष्ट दूर केले असतील तर कष्ट दूर करणारा भेटतो. तात्पर्य हे की हिंसेने हिंसा वाढते, अहिंसेने अहिंसा वाढते. करुणेने, करुणा वाढवते. दूषित भावनेने वातावरण अधिक दोषमय बनते. उत्तम भावनेने वातावरणात श्रेष्ठता, पवित्रता यांचा संचार होतो. दया ही असा एक उत्तम भाव आहे, ज्याने मानवता अलंकृत होते.
ज्ञानी जनांनी करुणेचे चार प्रकार सांगितले आहेत -
१) मोहयुक्त करुणा - मोहाचा अर्थ आहे अज्ञानता, करुणा अज्ञानजन्य सुद्धा असू शकते. उदा. एकलुता एक मुलगा आजारी पडला तर आईला डॉक्टरांनी सांगितले का याला गोड पदार्थ खायला देऊ नका. मुलाने जर मिठाई खाण्याचा हट्टच केला तर न राहवून आई त्याला थोडी मिठाई देते ही मोहयुक्त करुणा झाली.
- २) असुख करुणा - म्हणजे ज्याच्याकडे सुखसाधनांचा अभाव आहे, ज्याच्या आजच्या गरजा अन्न, वस्त्र, निवारा इ. देऊन भौतिक दुःख दूर करण्यासाठी भावना, आजाऱ्याला औषध, भूकलेल्याला जेवण इ. देणे, असुख करुणा आहे.
CITEmmansitionRTNEnylactioinine