________________
लाखाली जाऊन उभा राहिला. तिथे अनेक प्राणी आश्रयासाठी आलेले होते. मेरुप्रभ नीला शरीरावर खाज येऊ लागली म्हणून त्याने आपला एक पाय वर उचलला. तेव्हा नवदीच रिकामी झालेली जागा पाहून एक ससा तिथे येऊन बसला. हत्तीने पाय खाली वण्याचा विचार केला. पण सश्यावर अनुकम्पा निर्माण झाली, पाय तसाच वर अधांतरी लटकत ठेवला. पेटलेला वणवा अडीच अहोरात्री नंतर पूर्ण शांत झाला. मग आगीच्या भयाने मुक्त झालेले सर्व प्राणी बाहेर आले. परंतु मेरुप्रभ हत्ती अडीच दिवस तीन पायांवर उभा राहिला त्यामुळे चौथा पाय त्याला खाली ठेवताच येईना. थोडा जोरात प्रयत्न केला तर धडाम खाली कोसळला. त्यानंतर तीन दिवस भयंकर यातना भोगून आपले १०० वर्षांचे आयुष्य पूर्ण करून तो श्रेणिक राजाच्या घरी राजकुमार मेघकुमाराने जन्म घेतला.
. भ. मेघकुमाराला म्हणतात हे मेघ ! त्यावेळी प्राण्यावर अनुकम्पा कररून तू संसार (जन्ममरण) परित (कमी) केला आणि मनुष्य जन्म मिळवला. तात्पर्य असे की, अनुकम्पा एक शुभ भाव आहे, शुभ प्रकृती आहे. एका हत्तीसारख्या प्राण्यातून तो मनुष्य त्यातही राजकुमार रूपात जन्म घेण्याचे सौभाग्य मिळतवो.७३ अशी उदाहरणे साधकाच्या दृष्टीने अनुकरणीय आहेत.
उपाध्याय विनयविजयजींनी करुणा भावनेचे काव्यात्मक माधुर्यपूर्ण विवेचन केले आहे
संसारातील प्राण्यांची किती मोहमूढ अवस्था आहे. ते खाण्या-पिण्यात, बस्त्र, आभुषण इ.मध्ये किती व्यग्र असतात. वैवाहिक संबंध संतती तथा अनुकूल सुख भोग घण्यासाठी व्याकुळ होतात. मग त्यांचे मन स्थिर तरी कसे राहणार ? कोणत्याही मार्गाने का असेना तो धनसंपत्ती, वैभव मिळविण्याच्या प्रयत्नात असतो. आणि आपल्या ज्ञानानुसार त्यालाच शाश्वत समजून त्यास चिटकून राहतो. परंतु क्रूर, शत्रू, रोग, भय अथवा मृत्यू त्याचे हे ज्ञान अज्ञान सिद्ध करते. कित्यकांचे जीवन या स्पर्धेच्या युगात स्पर्धा करण्यातच खर्च होते. कित्येक क्रोध, मत्सर इ. ज्वालेत गधगत असतो. कित्येक धन, खी, भूमी इ. साठा भांडत असतात. काही धन प्राप्तीसाठी देश-विदेशात भटकत राहतात. दुःखी होतात. सपूर्ण विश्व जणू उद्वेग आणि आपत्तीने घेरलेले आहे. अशा स्थितीत ते प्राण्यांचे हित किंवा पदश कसे ऐकणार ? धर्माबद्दलचा एक शब्द सुद्धा त्यांच्या डोक्यात शिरत नाही. त्यांना
चम कर्म वगैरे थोतांड वाटते. अशाश्वताला शाश्वत समजून मृगजळासारखे नुसते धावत पाहत. मग त्यांच्या कष्टांचा आणि दुःखांचा वेग कसा थांबणार ?७४