________________
MSM
या लोकात इथेच त्याची फळे चाखायला मिळतात.
भगवती आराधनामध्ये आचार्य शीवार्य यांनी करुणेचे वर्णन करताना लिहिले आहे की- प्राणीमात्रांबद्दल अनुकम्पा भाव असणे म्हणजे करुणा. टीकाकारांनी करुणेची याख्या करताना लिहिले आहे की शारीरिक, आगन्तुक, स्वाभाविक, मानसिक तथा पाकतिक दःख जे असह्य आहेत त्याने पीडित असणाऱ्या प्राण्यांना पाहून असे चिंतन कराये की, मिथ्यादर्शन, अविरती, कषाय तथा अशुभयोगामुळे उपार्जित (उत्पन्न) अशुभ कर्मपर्याय आहेत. कर्मररूपी पुद्गल स्कन्धाच्या उदयामुळे विपत्तींना विवश होऊन भोगत आहेत. असा मनात जो भाव निर्माण होतो ती अनुकम्पा किंवा करुणा होय.६८
ज्याच्या हृदयात करुणेचा स्रोत वाहतो तो स्वतःच्या सर्व दुःखाना सहन करतो. परंतु दुसऱ्यांचे दुःखपाहून द्रवित होतो. फक्त द्रवितच होत नाही तर त्या दुःखांना दूर करण्याचा प्रयत्नही करतो. जे दुसऱ्यांच्या दुःखाला दूर करतात त्याच्यावर कधीच दुःख येत नाहीत. आणि पापोदयामुळे दुःख आले तरी ते दूर करण्यासाठी अचानक कोणी सहायता करणारा भेटून जातो. प्रत्येक परोपकाराच्या मागे करुणा भावनेची भूमिका सक्रीय असते.
संसारात लोक आपआपल्या कर्माच्या परिणामानुसार सातावेदनीय अनुकूल वेदनीय-सुख भोगतात. अनेक व्यक्ती असातावेदनीय-दुःख भोगतात-अनेक प्रकारची पीडा, वेदना तथा व्याधींनी ग्रस्त असतात. अनेक प्रकारच्या संकटांना तोंड देत असतात. अशा प्रकारच्या यातना, दुःख प्राप्त प्राण्यांबद्दल मनात दयाभाव असणे म्हणजेच कारुणभाव आहे. करुणा, अनुकंपा एकाच भावनेचे प्रतीक आहेत.
। करुणा हृदयाच्या कोमल, मृदू भावनांचे चिह्न आहे. अशांच्या मनात सात्त्विकता असते. जो दुसऱ्यांचे दुःख, पीडा पाहून द्रवित होत नाही, त्याचे हृदय पापणाचे जणू असते. भगवान महावीरांनी करुणा आणि अनुकं पावर फार जोर दिला आहे. प्रश्नव्याकरणातील खालील सूत्र हे स्पष्ट करते
"सव्वजग जीव रख्खन दयट्ठायाये पावयणं भगवया सुकहियं"६९ अर्थात संसारातील सर्वजीवांची रक्षा दया करण्यासाठीच महावीरांचा उपदेश आहे.
बौद्धधर्मात तर 'करुणे'ला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्यांनी इथपर्यंत म्हटले आह की, जो करुणा साध्य करू शकत नाही त्याशिवाय त्याला निर्वाण ही प्राप्त होऊ शकत नाही. महाकरुणा, महाशून्यावर फार जोर दिला आहे. महाकरुणा, करुणेचे अत्यंत
i liwomar
22222mwasn