________________
(६१९ )
● जातींमध्ये कलुषित वृत्ती अतिशय वेगाने समाविष्ट होते. म्हणून अधिक शक्ती परस्परामध्ये कमीपणा दाखवण्यात खर्च होते. ही किती वाईट वृत्ती आहे. जर ही शक्ती समाजाच्या कल्याणासाठी खर्च खाली तर किती चांगले होईल. आज मनुष्याचे हृदय फार संकुचित (झाले आहे. तो आपला स्वार्थ, लोभ आणि अर्थ लोलुपता सारख्या हलक्या वृत्तीचा शिकार बनला आहे.
अशाच प्रकारची दूषितवृत्ती, घृणास्पद व्यवहार जगात पसरू नये. मानव आपल्याच कर्मामुळे अजून दुःखी न व्हावा. या हेतूने शास्त्रामध्ये प्रमोद भावनाच्या रूपात जो सार्थक मार्ग प्रतिपादित केला आहे, त्याच्या आधार घेतल्याने विषम स्थिती आपोआप समाप्त होऊ शकेल.
ज्याच्या हृदयात इतरांचे सुख, संपन्नता, समृद्धी पाहून उल्लास आणि आनंद होतो ती व्यक्ती खरच महान असते. त्या व्यक्तीच्या उदारवृत्तीच्या प्रतिक्रिया सुद्धा फार उच्चप्रकारच्या असतात. अनुदारताने अनुदारताच जन्म घेते. दुसऱ्यांची प्रगती पाहून प्रकट होणारी प्रमोद भावनेमुळे वातावरण प्रेमपूर्ण, स्नेहमय बनते. विचारांची संकीर्णता आणि स्वार्थ परायणता टिकूच शकत नाही. प्रमोद भावनाची आजच्या युगात पदा-पदावर आवश्यकता आहे. जर प्रत्येक मनुष्याने या प्रमोदभावनेला आपल्या हृदयात स्थान दिले तर आपआपसातील अनेक विवाद, भांडण-तंटण, क्लेश, ईर्षा, द्वेष शांत होतील.
प्रमोदभावनेमुळे मनात मृदुता, मधुरता, कोमलता निर्माण होते. या भावनेचे चिंतन होतात. फार गुणकारी आहे. ईर्षाचे कालुष्य याने धुवून निघते. याने उत्तमोत्तम भाव जागृत सदवृत्तींचा विकास होतो.
गुणज्ञ व्यक्तीमध्ये अहंकार नसतो. तो कृतज्ञतेच्या भावनेने नम्र असतो. गुणजनांचे गुणगान करून त्या गुणांचे आस्वादन करण्यासाठी लालायित असतो. तो गुणीजनांची सतत प्रशंसा करतो.
ज्याच्यात गुण नाही आणि गुणांना ग्रहण करण्याची आकांक्षा ही नाही. असा माणूस आकृतीने सुंदर असला तरी सुगंधाशिवायच्या फुलासमान आहे. म्हणून जो आपल्या जीवनात प्रसन्न राहतो अथवा राहू इच्छितो त्यांना गुणार्जन करण्याची वृत्ती ठेवली पाहिजे. गुणार्जनाच्या भावनेचे दुसरे नाव प्रमोद भावना आहे.
स्तोकोपि गुणि संसर्गे श्रेयसे भूयसे भवेत् ।
गुणीजनांचा थोडा जरी आपणाला संपर्क मिळाला तरी तो महान कल्याणकारी सिद्ध होतो.