________________
(६१८)
ल्या जीवात एक छोटा गुण दिसला तरी तो खुश होतो. एका छोट्याशा गुणात ही मताकद असते की, जो अल्पशा भवात आत्म्यातील सर्व दोष नाश करून टाकू शकतो. याप्रमाणे अग्नीची एक ठिणगी हजारो मण कापसाला क्षणात जाळून नष्ट करते.
प्रमोदभावना महान दाता आहे. दुसरे दाते तर धन इ. तुच्छ क्षणिक वस्तूचे दान करतात. पण प्रमोद भावना तर शाश्वत सुख देणारे गुणांचे दान करते.
ज्यांचे मन निर्विकार आहे, ज्यांचा आचार आणि व्यवहार उच्च प्रतीचा आहे. जो जगातील जीवांचे कल्याण करण्यासाठी सतत तत्पर असतो, अशा महात्म्यांचे सतत नामस्मरण करणे ही सुद्धा प्रमोद भावनाच आहे. त्यामुळे अनेक कर्म नष्ट होतात. यात फार मोठे कष्ट ही नाहीत आणि फार मोठा त्यागही नाही. तरीही बदल्यात खूप लाभच लाभ आहे. अशी प्रमोद भावाना आत्मसात करण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. प्रत्येक व्यक्तीने आपले जीवन सूपासारखे करावे. सूप सार-सार गहि लये थोथा देर उडाय" म्हणजे गुणग्रहण करायचे अवगुणाकडे दुर्लक्ष करायचे. हंस ज्याप्रमाणे दूध-दूध ग्रहण करतो, पाणी मागे ठेवतो.
माझ्या पत्नीचे अपहरण केले होते. तो किती असदाचारी आहे असा विचार न करता रावणातील गुण लक्षात ठेवले. गुणग्रहणाची भावना ठेवली.
भगवती आराधनामध्ये प्रमोद भावनेला मुदिता भावना म्हटले आहे. मुदिता भावनेचे विश्लेषण करताना १६९१ व्या गाथेमध्ये श्री शीवार्याचार्य लिहितात - मुदिताचा आशय यतिगुण चिंता आहे. अर्थात् यती, श्रमण अथवा मुनींच्या गुणांचे चिंतन करून मनात प्रसन्न व्हावे. टीकाकाराने याचे स्पष्टीकरण असे केले आहे की, साधकाने चिंतन करावे की यती, मुनी, विनित-विनययुक्त, विराग-रागरहित, विभय-भयरहित आहेत, मान, अहंकार किंवा दंभ रहित आहेत, विरोध-रहित या क्रोध शून्य आहे. विलोभ-लोभ रहित आहेत. हे किती चांगले आहे. असा विचार करताना प्रसन्नता अनुभव करावी, गुणांचे संशोधन करणे-प्रमोद भावना आहे. परंतु आजच्या जनजीवनात प्रतिस्पर्धा, ईर्षा इतकी वाढली आहे की, व्यापार, उद्योग, राजनीती, सामाजिक क्षेत्र आणि इतकेच काय धार्मिक संत्रातही ती व्याप्त आहे. जेथे ईर्षा आहे, तेथे व्यक्ती, समाज एक दुसऱ्याची उन्नती, समृद्धी, संपन्नता आणि अभ्युदय सहनच करू शकत नाही. दुसऱ्यांची उन्नत स्थिती पाहून पडत होतात. याचा परिणाम असा येतो की ज्याची तो ईर्षा करतो त्याच्याबद्दल तसेच भाव होतात. कारण जशी क्रिया तशी प्रतिक्रिया. आज राष्ट्रा-राष्ट्रांत, वर्गा-वर्गात, जाती