________________
(६२७)
३) संवेग करुणा - ज्याच्या हृदयात मोक्षाची अभिलाषा आहे. त्याने विचार बाकी सर्व जीवांना मोक्ष मिळावा. सर्वांना परमशांती मिळावी. अशा संवेगमय जीवांना, मग मौज मजेत मस्तीत, रागरंगात मशगूल, असलेल्या लोकांना पाहून करुणा उत्पन्न होते की या भौतिक मौजमजेत वेळ दवडणाऱ्या लोकांचे कसे व्हायचे ? मग तो भावना करतो की भौतिक समृद्धीमध्ये डुंबणाऱ्या जीवांनी क्षणिक सुखाचा त्याग करून शाश्वत सखासाठी प्रयत्नशील व्हावे. ही आहे संवेग भावना,
४) अन्यहित करुणा - या करुणेचे क्षेत्र खूप विशाल आहे. सर्वजीवांच्या हिताची भावना, सर्वजीवाबद्दल अनुकंपा भाव, मग तो कोणी का असेना, ज्याच्याकडून कोणतेही स्वार्थ साध्य करण्याचा भावही नाही आणि राग किंवा द्वेष भावनेनेही नाही. फवत माणुसकीच्या नात्याने स्वाभाविकपणे सर्व जीवमात्राबद्दल करुणाभावना यालाच अन्यहित करुणा म्हणतात. दुःख विनाशिनी म्हटले आहे. या भावनेने हृदय कोमल बनते. दुसऱ्यांचे दुःख पाहू शकत नाही. इतके हळुवार मन होते. । कारुणभावना सर्व धर्मात समाविष्ट आहे. श्री गणेशमुनी 'शास्त्री' लिहितात
दया नदी के तीरपर, पलते सारे धर्म ।
छिपा हुआ सत्कर्म में, दया धर्म का मर्म ॥७५ तुलसीदासांनी पण म्हटले आहे
"दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान ।
तुलसी दया न छोडिए, जब लग घटमें प्राण ।।" धर्माचे मूळ दया आहे आणि पापाचे मूळ अभिमान आहे. जिथे दया, करुणा, कोमलता, आहे. अशांच्या हृदयातच धर्माचे बीज अंकुरीत होते. आणि जे हृदय कठोर आहे तिथे पापाचा वास असतो. करुणामुळे माणसाच्या मनातील भेद-भाव धुवून जातात. प्राणी मात्राशी आत्मीय संबंध जोडण्याची श्रृंखला करुणा आहे.
___ करुणा, मैत्रीचा प्रयोग आहे. संपूर्ण जगाशी ज्यांची मैत्री भावना आहे त्याची रुणा सुद्धा वैश्विक होऊन जाते. करुणेचा संबंध बाह्यदृष्टीने नसतो. ती तर आंतरिक
यातून प्रस्फुटित होणाऱ्या सरितेचा असा प्रवाह आहे जो सतत प्रवाहित होत राहतो. महावीर, बुद्ध, खाइस्ट इ. याचे उत्तमोत्तम उदाहरणे आहेत.
तीर्थकर महावीरांना जन्मदेणारी त्रिशलामाता तर फक्त जन्मदात्री माता होती.