________________
THE
TERMISHRA
उपशमन करतो. या उपशमन श्रेणीची वेळ अन्तर्मुहूर्त अर्थात एक मिनिटापासून चाळीस मिनिट काही कमी इतका असतो. त्या अन्तर्मुहूर्त काळाच्या समाप्तीनंतर आत्मा त्या उपशमश्रेणीतून खाली येतो. आणि पुन्हा त्या कर्मांचा बंध सुरू होतो. क्षपक
तीवर आरूढ झाल्यावर आत्मा बाकी राहिलेले मोहनीय इ. कर्मांनाही क्षय करून पूर्ण वीतरागी बनतो. असे अनन्तगुणांचे स्वामी तीर्थंकर परमात्म्याचे गुणगान करण्यात साक्षात् महस्पतीसुद्धा असमर्थ आहेत. त्यांचे गुणगान काय करावे ? तरी ही यथाशक्ती त्यांच्या सुकृत्याची अनुमोदना करने प्रमोद भावना आहे.६४
पुढे उपाध्यायजी निग्रंथ मुनींचे गुणगान करताना लिहितात- 'पर्वत, जंगल, गुफा तथा निकंज येथे राहुन धर्मध्यानात दत्तचित्त राहणारे प्रशमरसात संतुष्ट पक्ष आणि मास सारखे विशिष्ट दीर्घ तप करणारे, श्रुतज्ञानाने विशाल बुद्धी असणारे, उपदेशक, शान्त, दान्त, आणि जितेन्द्रिय बनून जो प्रभुशासनाची प्रभावना करतात ते निग्रंथ मुनी धन्य आहेत.६५ अशाप्रकारे वरील गुणांनी युक्त मुनींचे गुणगान करतात. तदनंतर साध्वीगण व श्रावकांचे गुणगान करताना लिहितात
जो श्रावक दान शील, तपाचे आचरण करतो आणि उत्तम भावना करतो अशाप्रकारे चारही धर्माची ज्ञान आणि श्रद्धेने आराधना करतो, तसेच जे साध्वीगण एवं श्राविका निर्जल बुद्धीने सदाचार पालन करतात ते सुद्धा धन्यवादाचे पात्र आहेत. या सर्वांची सतत अनेक वेळा जो अभिमान रहित भाग्यवानांची स्तुती करतात ते सुद्धा धन्यवादाचे पात्र आहेत.
"शान्तसुधारस'मध्ये उपाध्याय विनयविजयजींनी जे प्रमोद भावनाचे वर्णन केले आहे त्यात साधू, साध्वी, श्रावक, श्राविका रूप चार तीर्थांच्या गुणांचे वर्णन करून प्रमोद भावना प्रकट केली आहे.
। 'प्र'म्हणजे प्रकृष्ट, 'मोद' अर्थात आनंद, कोणत्याही जीवनात एखादा सुद्धा गुण पाहून अपार आनंदाचा अनुभव करणे प्रमोद भावना आहे.६९
__ संसारात अधिकांश लोग अनंता-अनंत अवगुणां (दोष) नी भरलेले आहेत. त्याच्यात एखाद्यात एक जरी गुण दिसला तर ज्याप्रमाणे आई आपल्या बालकाला पहिला शब्द बोलायला लागल्यावर किती आनंदित होते, त्यावेळी त्याच्या बोलण्यातले दोष पहात हा, उच्चार अस्पष्ट बोबडे बोलच तिला अत्यंत आनंदित करतात. बालक बोलायला लागला पाच तिला अपार आनंद होतो. त्याचप्रमाणे गुणानुरागीला अनंत काळापासून दोषांनी