________________
HI
नमकत करणारे चारित्र ज्याचे आहे त्याचा आत्मा त्यातच रममाण आहे. अशा र पुरुषांच्या गुणांना पाहून मन आनंदित होणे म्हणजे प्रमोद भावना होय.६१
आचार्य हेमचंद्रांनी प्रमोद भावना संबंधी लिहिले आहे की, ज्यांनी हिंसा इ. र दोषांचा परित्याग केला आहे, जो वस्तूच्या यथार्थ स्वरूपाला समजतो. ज्यांना
ज्ञान, सम्यग्दर्शन, सम्यगचारित्र प्राप्त झाले आहे. त्या महापुरुषांच्या गुणांचा आदर करावा ही प्रमोद भावना.६२
शांतसुधारसमध्ये उपाध्याय विनयविजयजींनी प्रमोद भावनेचे विश्लेषण करताना लिहिले आहे- पर्वताच्या शिखरावर, एकांत वन-प्रदेशात गुफामध्ये बसून धर्मध्यानात लीन, समता रसाने तृप्त, तपाचरणात मग्न साधू धन्य आहेत. अन्य ज्ञानीजन, श्रुतप्रज्ञा युक्त, धर्मापदेश करणारे, शांत जितेंद्रिय तथा जगात जिनशासनदेवाची प्रतिष्ठा वाढवाणारे मुनीवृन्द, धन्य आहेत.
_ जे गृहस्थ दान देतात, शीलव्रत धारण करतात, तपश्चर्या करतात, सुंदर भावना करतात, श्रद्धापूर्वक धर्माची आराधना करतात ते धन्य आहेत. साध्वीवृन्द आणि श्राविकावृन्द जे निर्मल ज्ञानाने युक्त, शीलशोभा युक्त आहेत त्याही धन्य आहेत. भाग्यशाली व्यक्ती रोज या सर्वांची विनयपूर्वक भक्ती करतात. मिथ्यादृष्टी असणाऱ्यामध्ये सुद्धा परोपकार इ. विशिष्ट गुण असतील. संतोष, सत्य, उदारता, विनय इ. त्यांचीही आम्ही अनुमोदना करतो.
दुसऱ्यांचे गुण पाहून आनंदित होऊन, ज्यांची प्रज्ञा समता-सागरात लीन राहते. त्यांच्या मनात अत्यंत प्रसन्नतेचा अनुभव होतो.
- उपाध्यायद्वारा केलेले हे प्रमोद भावनेचे फारच सुंदर विवेचन आहे. पुढे गीतिकामध्ये स्वतःला संबोधित करून म्हणतात- हे विनय । तु गुणामध्ये परितोष अनुभव कर, अर्थात दुसऱ्यांचे गुण पाहून मनात संतोष अनुभव कर. आपल्या शुभकर्माच्या भारणामामुळे दुसऱ्यांनी ज्या विशेषता प्राप्त केल्या आहेत, त्यांच्याबद्दलसुद्धा ईर्षाभाव ठेवू नकोस, आनन्द प्रमोद भावाचा अनुभव कर.
ही किती चांगली गोष्ट आहे. कोणी भाग्यशाली दान देतो आणि जगात सन्मानप्राप्त करतो. त्याला पाहून तू असा विचार का करीत नाही की मी सुद्धा दान देईल ज्यामुळे मीसुद्धा पुण्याचा भागीदार बनू शकेन.६३
गुणांचा सन्मान केल्याने तशी अनुभूती केल्याने व्यक्तीमध्ये असलेल्या गुणामध्ये