________________
(६१४)
प्रमोदभावना आत्मविकास व सद्गुणांच्या संचयसाठी श्रेष्ठ व सहज मार्ग असल्याने अनुकरणीय आहे. प्रमोद भावनेमुळे प्रमाददोष नष्ट होतो. गुणानुरागी दृष्टीमुळे गुणीजनांचे आशीर्वाद प्राप्त होतात. आणि लोकप्रियता वाढते. दोषदृष्टी एक उग्र कोटीचे विष आहे, जो भवभवपर्यंत जीवाला मारत राहतो. परंतु गुणदृष्टी अर्थात प्रमोद भावना ते अमृत आहे जो जीवाला अजर अमर बनवतो.
श्रीनमस्कार महामंत्रचे ध्यान म्हणजे प्रमोद भावनेची उपासना करण्याचे सर्वश्रेष्ठ साधन आहे. नमस्कार मंत्र चौदापूर्व ज्ञानांचे सार आहे. अर्थात् प्रमोदभावनेला चौदापूर्व ज्ञानाचे सार म्हटले तर ती अतिशोयक्ती होणार नाही. श्री नवकार सर्व शास्त्रात व्याप्त आहे. तसेच प्रमोद भावना सर्व शास्त्रात व्याप्त आहे.
'नमो' हे मोक्षाचे बीज आहे. ज्याप्रमाणे नमस्कार सर्व पापनाशक आहे आणि सर्व मंगलात प्रथम मंल आहे. त्याचप्रमाणे प्रमोदभावनासुद्धा सर्व पापनाशक आणि सर्व मंगलात प्रथम मंगल आहे.
ग्रंथकार ग्रंथाच्या प्रारंभी इष्ट देवतांना नमस्कार रूप भाव मंगल करतात, त्याचा अर्थच असा की सर्व शास्त्र आणि सर्व मंगल कार्याचा प्रारंभ प्रमोद भावनेनेच होतो. ६० अशाप्रकारे प्रमोदभावनेचे कारण शुभ आलम्बनाचा आदर केल्याने विघ्नांचा नाश होतो. तसेच ध्यान इ. मध्ये दृढता प्राप्त होते..
प्रत्येकाच्या आत्म्यात ज्ञान, दर्शन, चारित्राची अपार शक्ती आहे. परंतु जोपर्यंत आत्मा कर्माच्या आवरणाने मुक्त होत नाही तोपर्यंत साऱ्या शक्ती अप्रकटित राहतात. मानवाचे जीवन स्वार्थ इ. भावनेमुळे संकीर्ण बनते. स्वार्थी मनुष्य फक्त आपले तेवढे हित पाहतो. आपलेच गुण पाहतो. इतरांच्याबद्दल त्याच्या मनात तुच्छता आणि हीन भाव असतात. असे चिंतन अत्यंत हलक्या प्रतीचे चिंतन असते. याने आत्म्याचे अधःपतन होते. अशुभप्रवृत्तींचा जोर वाढतो. मानवजीवनच मुळी निरर्थक होऊन जाते. म्हणून आचार्यांनी प्रमोदभावनेच्या रूपाने आपले चिंतन उदारव्यापक आणि श्रेष्ठ करण्याची प्रेरणा दिली आहे. विशेषरूपाने सांगितले आहे की, गुणीलोकांच्यातील उत्तम गुणांना पाहून व्यक्तीच्या मनात प्रसन्नता निर्माण झाली पाहिजे.
आचार्य शुभचन्द्रांनी प्रमोद भावनेचे वर्णन करताना लिहिले आहे की, जो मनुष्य तप, शास्त्राध्ययन, यम-नियम इ. योग आराधनामध्ये संलग्न आहे, ज्ञानही ज्याचे नेत्र आहेत, इंद्रिय मन व कषायांना जिंकणारा आहे. आत्मतत्त्वाच्या अभ्यासात प्रवीण आहे.