________________
(६१२)
प्रशंसा करतात, याला गुणानुराग किंवा प्रमोद भावना म्हणता येणार नाही.
ईर्षा इत्यादी दोष दूर करण्यासाठी प्रमोद भावनेचे चिंतन अत्यंत आवश्यक आहे. दोषदृष्टी जर असेल तर तिथे गुणदृष्टी कधीच नसणार. उदा. एका गावात प्राचीन मंदिर होते. लोकांना त्या मंदिरावर अत्यंत श्रद्धा होती. मंदिराची फार पडझड झाली होती. मंदिरात जातांना लोक घाबरत होते की कुठे मंदिर पडून तर जाणार नाही ना ? शेवटी काही दिवसांनी लोकांचे मंदिरात येणे कमी-कमी होत गेले. एक दिवस गावातील सर्व लोक एकत्र जमा झाले आणि मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा विचार केला. जीर्णोद्धारासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या संपत्तीपैकी तीन तृतीयांश हिस्सा घ्यावा असे ठरले. आहे त्या ठिकाणीच मंदिर बांधावे आणि तिथल्याच दगडांचा पुन्हा उपयोग करावा. निर्णय झाला पण एक श्रद्धाळू व्यक्तीने एक प्रस्ताव मांडला की, जोपर्यंत नवीन मंदिर बांधले जात नाही. तोपर्यंत जुन्या मंदिरातील प्रतिमा हलवू नये. आणि मंदिर पाडू नये. परंतु जुने पाडल्याशिवाय नवीन निर्माण असंभव आहे. त्याचप्रमाणे अप्रशस्तापासून दूर हटल्याशिवाय प्रशस्तामध्ये येणे असंभव आहे. दोषदृष्टी घालविल्याशिवाय गुणदृष्टी गुणानुरागिता किंवा प्रमोदभावना येणे शक्यच नाही. जिनहर्षगणि म्हणतात
उत्तमगुणाणुराओ-निवसई हिय यंमिजस्स पुरिसस्सं । अतित्थयरपयाओ, न दुल्लुहा तस्स रिद्धिओ ||१७
ज्याच्या हृदयात उत्तम गुणवानांच्याबद्दल उत्कृष्ट अनुराग असतो त्यासाठी तीर्थंकर पदापर्यंतची रिद्धी दुर्लभ नसते. अर्थात त्यांना सर्व रिद्धि-सिद्धि सुलभतेने मिळतात.
जिनहर्षगणि कुलकमध्ये पुढे म्हणतात, किती ही तप केले, शास्त्राभ्यास केला. अनेक कष्ट सहन केले. परंतु जर दुसऱ्यांच्या गुणांची प्रशंसा केली नाही तर सर्व क्रिया निष्फल आहेत. दुसऱ्यांची प्रशंसा ऐकून जो मत्सर करतो, त्याचा निश्चित पराभव होतो. जगात जर मोठेपणा पाहिजे असेल, मोठे व्हायचे असेल, सर्वत्र विजय व्हावा असे वाटत असेल तर दुसऱ्यांचे दोष पाहण्याची वृत्ती सोडली पाहिजे. ५८ आणि चिंतन करायला पाहिजे की, या संसारात अनेक सतपुरुष आहेत ज्यांच्यात अनेक सदगुण आहेत. कित्येक महापुरुष ज्ञानाचे भंडार आहेत. अनेक सूत्राचे ज्ञाते आहेत. जैनागमातील रहस्यांना श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचणारे, सिद्धान्त समजावून सांगणारे, तर्क-वितर्क द्वारा गंभीर विषय अगदी साध्या सोप्या भाषेत व्यक्त करणारे, कुतर्क करणाऱ्यांना अगदी शांतपणे • विलक्षण कवित्व शक्ती व वक्तृत्व शक्तीने समजावणारे प्रभावशाली उपदेशाने धर्माची