________________
(६१०)
ढगांना पाहून पावसाचे आगमन होणार या आनंदाने मोर पिसारा फुलवून नाचायला लागतो, त्याचप्रमाणे गुणीजन धर्मात्मापुरुष, समाजातील निष्ठावान व व्रतबद्ध सेवक तसेच राष्ट्राचे सेवाभावी नायक, सज्जन लोक यांना पाहताच चित्त प्रसन्न झाले तर समजावे की ही प्रमोदभावना आहे.
गुणग्राहक व्यक्तींनी अशी खरी प्रशंसा केली तर प्रोत्साहन मिळते व मरगळलेल्या मनात उत्साह निर्माण होतो. सुकून गेलेल्या रोपट्याला जसे पाणी घातले की ते टवटवीत होते तशी टवटवी येते त्याचप्रमाणे प्रशंसाचे जळकण कोमेजलेल्या अतःकरणाला उत्साहाला टवटवी आणतात. प्रशंसा आणि प्रोत्साहनाने अनेक व्यक्तींना पाठिंबा दिल्याने पुण्य प्राप्त होते..
इतरांना सुधारण्याची योग्य मार्गदर्शन करण्याची इच्छा असेल तर त्यांच्यातील दोषांना हळूवारपणे दूर करण्यासाठी प्रशंसा आणि प्रोत्साहन उत्तम आणि सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. यामुळे सद्भावना वृद्धींगत होतात आणि दुर्भावना कमी होतात. जेव्हा मनुष्याला एकच गोष्ट वारंवार सांगण्यात येते तेव्हा त्याचे अर्न्तमन हळूहळू तसेच समजायला लागते. त्याची मनोभूमी त्यानुसार व्हायला लागते. म्हणून मानसिक विकासासाठी गुणान्वेषी दृष्टी, सज्जनांकडून प्रशंसा आणि प्रोत्साहनाची फार उपयोगिता आहे. म्हणून प्रमोदभावना विकसित करण्यासाठी गुणदृष्टी असणे आवश्यक आहे.
दोषदृष्टीचे दुष्परिणाम ज्या व्यक्तींची वृत्ती क्षुद्र असते तो कुढणारा आणि इर्षालू असतो. तो आपल्या शक्तीचा उपयोग दुसऱ्यांचे दोष शोधण्यात करतो. दुसऱ्यांचे दोष पाहून दीन दुःखी होतो. दोषदर्शन करण्याचा कुविचार असल्याने त्याच्या शक्तीचा -हास होत राहतो. त्याच शक्तीचा सदुपयोग (गुणग्राहकता) केला तर तो आपले आणि दुसऱ्यांच्या हिताचे मोठे काम करू शकतो. इतरांचे दोष ढुंढाळण्याने माणसाला काहीच फायदा होत नाही. उलट नुकसानच होते.
-
प्रत्येक वस्तूची फक्त वाईट बाजूच पाहिल्याने, दोष, छिद्र शोधत राहिल्याने काही काळानंतर हाच स्वभाव बनून जातो. मग अशी स्थिती होते की अशा माणसाला सतत प्रत्येक वस्तूमध्ये दोष किंवा बिकृती शोधण्याशिवाय चैनच पडत नाही. कोणतेही अन्य कारण नसले तरी तो स्वतः दूषित दृष्टिकोन, दुर्भाव, दुर्विचारांनाच विकसित करतो.
दुसऱ्यांचे दुर्गुण शोधणे म्हणजे टी. बी. कॅन्सर इ. रोगापेक्षाही भयंकर मानसिक रोग आहे. या रोगाने व्यक्तीच्या विकासाच्या मूळातच क्षयासारखी कीड लागते. दोषदृष्टीमुळे