________________
(६०८)
व्यक्तीत सुद्धा अवगुणच दिसतात.
उदा. एकदा कृष्णवासुदेवांनी युधिष्ठिर आणि दुर्योधनाला सांगितले नगरीत जा आणि गुणवान लोक किती आहेत आणि अवगुणी किती आहेत ते पाहून या. दोघे नगरीत हिंडले त्यांनी 'कृष्णाला 'सांगितले- युधिष्ठिर म्हणाले मला तर सान्या नगरीत एकही अवगुणी दिसला नाही. प्रत्येक व्यक्तीत एक ना एक गुण आहेच. जेव्हा दुर्योधन म्हणाला, 'मला तर साऱ्या नगरीत सगळेच अवगुणी दिसले. एकही गुणवान मनुष्य नगरीत भेटला नाही.
गुणदृष्टी हंससारखी आहे आणि दोषदृष्टी कावळ्यासारखी आहे. संपूर्ण शरीर चांगले असेल पण शरीराचा एखादा भाग जर जखमी असेल तर कावळा त्याच्यावरच बसणार. परंतु ज्यांची गुणदृष्टी असते त्याला काट्यातही फूल दिसेल. ५०
प्रमोद भावना ज्याच्यात आहे त्या मानवाची भावना अशी असते"सौ प्राणी आ संसारना सन्मित्र मुज बहाला हजो, सदगुणमां आनंद मानू, मित्र के वैरी हजो ||"
`शत्रुमित्राबद्दल समभाव असणे शत्रूमध्येही गुण पाहणे प्रमोदभावना आहे. योगदर्शनात याला मुदिता भावना म्हटले आहे. ५१
गुण नसतानाही एखाद्या व्यक्तीला पद प्रतिष्ठा मिळते. अशा व्यक्तीला प्रसन्न ठेवण्यासाठी त्याच्या पुढे-पुढे करणे, रुपये मिळवणे अथवा गैरे संबंधी आपले कोणतेही कार्य साधून घेण्यासाठी त्याची खुशामद करणे म्हणजेच चापलूसी करणे यास प्रमोदभावना म्हणता येणार नाही. गुणग्राहकता व चापलुसी यात जमीन आसमानाचे अंतर आहे.
गुणग्राहक व्यक्ती एक ना एक दिवस सद्गुणी बनते. "यद् ध्यायती तदभवति जी व्यक्ती जसे चिंतन करते ती तशीच बनून जाते. प्रमोद भावनेचा साधक महान आत्मा तसेच आपल्यापेक्षा आत्मविकासात प्रगती केलेल्या सतपुरुषांच्या उज्ज्वल आणि पवित्र गुणांचे चिंतन करतो त्यामुळे तसाच बनतो.
गजसुकुमाराची क्षमा, धर्मरुची मुनींची करुणा, भ. महावीरांचे उग्र तप व कष्ट सहिष्णुता, शालीभद्राने पूर्वजन्मी केलेले दान-धन्नाचे वैराग्य, श्रीरामाचा समभाव, श्रीकृष्णाची अनसक्ती, कर्मयोग इ.च्या गुणांचे चिंतन केल्याने साधकाला खूप आत्मबल, अद्भूतप्रेरणा तथा त्यानुसार आचरणाचे प्रोत्साहन मिळते. ५२ “महानीति भावयन महानभवति” जो मनुष्य महान बनण्याची भावना करतो ते अवश्य कधी न कधी महान बनू शकतो. म्हणून “मेरी भावना"त म्हटले आहे