________________
SE
२) गुणी आणि गुणद्वेषी - स्वतः गुणवान असून दुसऱ्यांच्या गुणांना जो पाहू त नाही. प्रशंसा ऐकू शकत नाही. आणि प्रसन्नता ही घालवतो तो ईर्षालू बनतो. मिळे पनुष्य-चित्तशांती घालवतो. स्वतःच स्वतःचा नाश ओढवतो उदा. सिंह गुफावासी
LINES
13
। सिंहगुफाबासी मुनी स्थुलिभद्रमुनिचे गुरू बंधू होते. जेव्हा स्थुलिभद्रमुनि रूपकोशा नावाच्या नर्तकीच्या घरी चातुर्मास करून आपल्या संयमभावनेत निश्चल राहन. अखंड संयमी राहून गुरूजवळ आले. तेव्हा सिंहगुफावासी मुनी, सर्पाच्या बिळाजवळ उभे राहून चातुर्मास करणाऱ्या मुनीला आणि विहिरीच्या किनाऱ्यावर उभे राहून चातुर्मास करणाऱ्या मुनींना धन्यवाद देताना गुरू म्हणाले, तुम्ही फार दुष्कर काम केले असे म्हणून त्यांच्या साधनेची खूप प्रशंसा केली. परंतु जेव्हा स्थूलिभद्रजी गुरूच्या चरणी आले तेव्हा गुरुदेव म्हणाले, "वाह ! वत्स तू तर फार-फार दुष्कर, दुष्कर काम केले, साधना केली धन्य आहे, धन्य आहे. अशी त्यांची सर्वात जास्त प्रशंसा गुरुदेवांनी केली तेव्हा सिंहगुफावासी मुनींच्या मनात ईर्षा आणि द्वेषाची आग भडकली. स्थूलिभद्रजी रूप कोषानर्तकीच्या महालात भरपूर सुखसुविधाने राहून आले आणि आम्ही तर किती कष्टात मृत्यूच्या मुखातून, निर्भयपणे निसंग साधना करून आलो तरी ही आमच्यापेक्षा याची अधिक प्रशंसा । असे का ? मी सुद्धा पुढचा चातुर्मास त्याच महालात जाऊन करीन असा मनात निर्णय केला. मनात निर्माण झालेल्या इर्षेने त्यांनी गुरूकडून आज्ञा मिळविण्याचा प्रयत्न केला पण गुरुंची अवज्ञा करून अविचाराने आपली पावले उचलली आणि पुढचा चातुर्मास कोशावेश्याच्या तिथे केला पण परिणामरूप उलट झाला. ते संयमी जीवनापासून विचलित झाले. पण सभाग्याने रूपकोषा स्थूलिभद्राच्या बोधामुळे श्राविका झाली होती. तिनेच त्या मुनींना बोध दिला आणि अनर्थापासून वाचवले.
संयमापासून पतित होण्याचे एकच कारण होते. ते स्वत: गुणवान होते. परंतु गुणानुरागी नाही बनू शकले. विनय विवेक मदिचा नाश केला. आणि अवनतीचा मार्ग पकडला. म्हणून प्रमोद भावनामध्ये "पर सुख तुष्टिमुदिता'' गुणी लोकांचे गुण पाहून सुखी जीवांच्या सुखाला पाहून आनंदित होणे प्रमोद भावना आहे.
३) अवगुणी आणि गुणद्वेषी - स्वतःत गुण नाही आणि दुसऱ्यांचे गुण पाहू शकत नाहीत. ज्यांच्या दृष्टीला अवगुण पाहण्याची सवय झाली आहे त्यांना जगात कोणी गुणवान दिसतच नाही. गुणग्राहीला मात्र सर्वत्र गुण ही दिसतात. गुणद्वेषीला चांगल्या
SSES