________________
र असतात व अन्य व्यक्तीतही असतात, त्या गुणांची प्रशंसा करणे ते आपले असो की दसऱ्याचे. गुणच जीवाला गुणवान बनवतो.
__गुणः पूजास्थानं गुणीषु न च लिंग न च वयं । गुणपूजा मुख्य आहे त्यात लहान-मोठा असा भेदभाव नाही. ज्यांच्यात गुण असतात त्यांची सर्वत्र पूजा होते. देवपण त्यांची सेवा करतात. हरिकेशीमुनि ज्यांचा जन्म कर्मोदयामुळे चांडाळ कुळात झाला, परंतु त्यांचे भवितव्य उत्तम असल्यामुळे त्यांना संतांचा योग मिळाला आणि स्वतः योग्य पात्र असल्यामुळे संत बनले. त्याग संयम, ज्ञान, ध्यान, सदाचार आणि सद्विचार यांच्या सहयोगामुळे यक्ष त्यांच्या गुणामुळे त्यांच्याकडे आकर्पित झाला आणि त्यांच्या चरणी सेवक म्हणून अहर्निश त्यांच्या सेवेत राहू लागला “सबखं खु दीसह तवो विशेषोः''४९ अर्थात साक्षात तप इ. गुणांची विशेषता आणि प्रधानता आहे.
प्रमोदाची प्रतियोगी ईर्षा आहे. मनुष्याने ठरविले की गुणसंपन्न बनायचे आहे तर एक-एका गुणांचा स्वीकार करून गुणवान बनू शकतो. परंतु ईर्षालू इयेच्या अग्नीत स्वत: जळतो आणि दुसऱ्यांनाही जाळतो. गुणवान असणे सरळ आहे पण गुणानुरागी असणे फार कठीण आहे.
या जगात तीन प्रकारचे जीव आहेत. १) गुणी आणि गुणानुरागी २) गुणी आणि गुणद्वेषी ३) अवगुणी आणि गुण
द्वेषी
१) गुणी आणि गुणानुरागी - जो स्वत: गुणवान आहे आणि दुसऱ्यात असलेल्या गुणांना पाहून खुश होतो. त्यांच्या गुणांची अनुमोदना आणि प्रशंसा करतात. गुणाना पाहून प्रमोदित होतात. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण भगवान रस्त्यात सडलेली कुत्री पाहून म्हणतात, ही कुत्री सडलेली आहे पण हिचे दात किती स्वच्छ आणि सुंदर आहेत ! पण रस्त्याने जाणारे-येणारे लोक मात्र नाकावर तोंडावर फडके ठेवून तिची घृणा करत होते. श्रीकृष्ण स्वतः गुणी होते. त्यांच्यात गुणानुराग सुद्धा किती विकसित झाला होता. हेच
या उदाहरणाने सिद्ध होते.
गुणानुरागाशिवाय सम्यग्दर्शन पण प्रकट होत नाही. धर्माराधना सुद्धा फलदायी त नाही. गुणानुरागीच धर्मात्मा बनू शकतो. गुणानुरागाने तीर्थंकर पद पण प्राप्त होऊ हेत. म्हणून गुणानुराग हा गुण जोपासून वाढविणे अत्यंत जरूरीचे आहे.