________________
गुणीजनोंको देख हृदयमें मेरे प्रेम उमड आवे । बने जहाँतक उनकी सेवा करके यह मन सुख पावे ॥ होऊ नहीं कृतघ्न कभी मै द्रोह न मेरे उर आवे ।
गुणग्रहण का भाव रहे नित, दृष्टि न दोपोंपर जावे ॥५३ हा संसार फूल आणि काटे या दोन्हींचा संग्रहालय आहे. आपण तर भ्रमराप्रमाणे काट्यांची चिंता सोडून गुणरूपी रस ग्रहण करायला पाहिजे.
लोहचुंबकासमोर दगड, लाकुड, मातीचे कण इ. अनेक वस्तू ठेवल्या, परंतु ते सर्व सोडून तो फक्त लोखंडाच्या वस्तू असतील तेवढ्याच आपल्याकडे ओढून घेतो. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीमध्ये क्रोध, मान, माया ईर्ष्या द्वेष इ. कितीही अवगुण असोत, ज्याची गुण ग्रहण करण्याचा वृत्ती असेल तर त्यातून जो गुण असेल तेवढाच ग्रहण करतो.५३
एकदा गांधीजी लंडनला चालले होते. स्टीमरमध्ये एका इंग्रजाशी त्यांची ओळख झाली. तो इंग्रज सारखा त्यांना काहीतरी मनाला लागेल असे बोलत होता. गांधीजींना तो आपला शत्रू आहे असेच समजत होता. आणि गांधीजी त्याचे बोलणे ऐकून फक्त हसत होते. त्या इंग्रजाने एक लांबलचक कविता लिहिली ज्यात प्रत्येक शब्दात गांधीजींबद्दल कुटुता, घृणा आणि द्वेष प्रकट होत होता. त्याने ती कविता गांधीजींच्या हातात दिली. गांधीजींनी त्या कवितेतील एक दोन ओळी वाचल्या. आणि संपूर्ण कवितेचा मतितार्थ त्यांच्या लक्षात आला. काही एक न बोलता त्यांनी कवितांच्या पानावर असलेली टाचणी काढली ती आपल्या डबीत ठेवून दिली अन् ते सर्व कागद रद्दीच्या टोपलीत टाकून दिले.
इंग्रज लगेच म्हणाला हे काय ! संपूर्ण कविता तर वाचा. तुम्हीतर एकदोन आळीच वाचल्या असतील. गांधीजी हसत म्हणाले, "याचा सार ती टाचणी तेवढी मी काढून घेतली."५५
दोषदृष्टी असणाऱ्यांची जगात कमतरता नाही. ज्यांच्यामुळे गुणी लोकांना खूप बाट सोसावे लागतात. म्हणून मानवाचे हे परम कर्तव्य आहे की त्याने गुणानुरागी बनून
सद्गुणांचा संचय करावा.
गुणाधिक व्यक्तींबद्दल आदरभाव ठेवावा, गुणग्राहकता असावी, अशा गुणीजनांना पाहून मन प्रमोदित व्हावे. हे प्रमोदभावनेचे व्यापक रूप आहे. ज्याप्रमाणे आकाशात काळ्या