________________
(६२२)
आणि व्यापक रूप आहे. एका पीडित व्यक्तीला पाहून मनात इतकी तीव्र करुणा उत्पन्न होते ज्याप्रमाणे आपल्या पुत्राला संकटात पाहून आईच्या हृदयात करुणा निर्माण
होते.
आचार्य शुभचंद्रांनी करुणाभावनेचे वर्णन करताना लिहिले आहे- जे जीव दैन्य, गोक, त्रास, रोग इ. पीडेने दुःखी आहेत, बंध-बंधनाने अवरुद्ध आहेत. जीवनाची याचना करतात, आम्हाला वाचवा असा आक्रोश करतात. क्षुधा, तृष्णा, परिश्रान्ती इ. ने दुःखीत आहेत, शीत, उष्ण इ. ने पीडित आहेत, लोक ज्यांच्याशी निर्दयतापूर्वक वागतात, जे मरणप्राय दुःख भोगत आहेत अशा अनेकानेक प्रकारच्या दुःखांनी ग्रासलेले आहेत त्यांना पाहून त्यांचे दुःख दूर करण्याची बुद्धी होणे म्हणजे करुणा भावना आहे.७०
आचार्य हेमचंद्रांनी करुणा भावना संबंधित संक्षेपात असा उल्लेख केला आहेदीन, आर्त, दुःखित, भयभीत प्राणी जे आपल्या जीविताची भीक मागत आहेत त्यांचे दुःख दूर करण्याची भावना, करुणा भावना आहे.७१
दुःखी जीवांना पाहून ज्याच्यात हृदयात स्पंदन होते त्याचे जीवन जगणे सार्थक आहे ज्याच्या हृदयात दया, करुणा, अहिंसेचे भाव आहेत. भागवत पुराणात राजा रंतिदेवाचे आख्यान प्रसिद्ध आहे. ते अत्यंत करुणाशील व प्रजावत्सल होते. एकद रंतिदेवाच्या राज्यात दुष्काळ पडला. राजाने आपला सर्व अन्तभंडार दुष्काळपीडितांसाठी उघडा केला आणि प्रतिष्ठा केली की जोपर्यंत माझ्या राज्यात एक माणूस जरी उपाशी असला तर मी अन्न ग्रहण करणार नाही. ४९ दिवस राजाने अन्न ग्रहण केले नाही. शेवटी मंत्र्याच्या आग्रहामुळे राजा भोजन घेण्यासाठी बसला. एक घास अजून तोंडात घातला न घातला तोच एका खीचा आवाज आला. राजा जेवायचे थांबला. आपल्यापुढचे अन्न त्या स्त्रीला देऊन टाकले. दुसऱ्यांदा कुत्रा भुंकला. त्याला भाकरी देऊन टाकली, आता राजाच्या समोरील ताट रिकामे झाले. राजाने पाणी पिऊन आपली भूक भागवली. तेवढ्यात देवांनी रंतिदेवाच्या जयजयकाराची घोषणा दिली. राजाची असीम करुणा पाहून देवांनी जलवृष्टी केली. दुष्काळ, सुकाळात परिवर्तित झाला. असा आहे खऱ्या करुणेचा प्रभाव !७२
करुणा, दया अनुकम्पा समानार्थी शब्द आहेत. मनुष्यच काय जनावरामध्ये सुद्धा अनुकपचा भाव असतो. ज्ञानाधर्म कथामध्ये श्रमण भ. महावीर मेघकुमारांच्या पूर्वभवाचे
न करतात. ज्यावेळी मेघकुमार मेरुप्रभ नावाच्या हत्तीच्या जन्मात होते तेव्हा एकदा "मातूमध्ये जंगलात वणवा पेटला. तेव्हा मेरुप्रभ हत्ती आपल्या रक्षणासाठी गवताच्या