________________
(६०५)
सर्वांचे ध्येय, लक्ष्य एकच आहे, मार्ग समान आहे तर प्रत्येकाची एक दुसऱ्याशी मित्रता असणे स्वाभाविक आहे.
"परस्परोपग्रहो जीवानाम् । ४६ एक दुसऱ्याच्या उपयोगी पडणे हा जीवमात्राचा स्वभाव आहे. शारीरिक भिन्नतेमुळे जीवाचे विभिन्न रूप असले तरी एक दुसऱ्यासाठी समर्पित होण्याचा गुण त्याच्यात विद्यमान आहे. या समर्पण भावनेचे दुसरे नाव मैत्री आहे. मैत्रीचा अनुभव तोच करू शकतो ज्याचे हृदय प्रेम, सहानुभूती व सौजन्याने परिपूर्ण असते.
मित्रतेचा निर्वाह तेव्हा होतो जेव्हा हृदयात खरे प्रेम असेल. एक दसऱ्यांच्या उपयोगी पडावे, गुणांवर दृष्टी असावी. गुणांना पाहून उत्साहित, प्रसन्न व्हावे.
मैत्री भावनेमध्ये समस्त जगाबद्दल मित्रत्वाची भावना करण्याची प्रेरणा मिळते. परंतु ही मैत्री वाढवावी कशी ? त्याचे समाधान प्रमोदभावनेने होते. मैत्रीला साकार रूप देण्याचा उपाय प्रमोद भावना आहे. आपली आंतरिक प्रसन्नता, कृतज्ञता, हित मित, प्रिय, शिष्ट वाणीने अभिव्यक्त करावी. ही अभिव्यक्ती अनेक प्रकाराने करता येते. उदा. आदर दाखवून, गुणांचे वर्णन करून, भोजन इ. देऊन सत्कार करून, एक दुसऱ्यांच्या सुखदुःखाविषयी विचारपूस करून, दुःख दूर करण्याचा प्रयत्न करून, दुसऱ्या शब्दात सांगायचे तर मित्रता व्यक्त करण्यासाठी, मैत्री इ. करण्यासाठी प्रमोद भावना जरूरी आहे. सर्वार्थ सिद्धि वृत्तीमध्ये प्रमोद भावनेचा अर्थ असा सांगितला आहे.
बदनं प्रसादादि भिरभिव्यज्यमानान्तर्भावितरागः प्रमोद:४७ चेहऱ्यावर प्रसन्नता अंतरंग भक्ती व अनुराग व्यक्त करणे म्हणजे प्रमोदभावना आहे.
प्रमोदभावाचे धनी गौतमगणधर यांनी अतिमुक्तक राजकुमाराची अगदी लहान बालकाप्रमाणे सरलता, सुलभ बोधिता पाहून त्याला बरोबर घेऊन त्याच्या घरी जातात. त्याला महावीरांच्या दर्शनाला घेऊन जातात. त्यामुळे अतिमुक्तकावर इतका परिणाम होतो का त मुनी दीक्षा अंगिकार करतात.४८ जो स्वत: गुणी आहे तो दुसऱ्यांच्या गुणांचा आदर करू शकतो.
महापुरुषांच्या गुणांबद्दल सद्भाव ठेवणे त्यांची स्तुती अनुमोदना करणे, गुणांची असा करणे प्रमोद भावना आहे. प्रमोदभावनेचा पाया गुणानुराग आहे. गुण आपल्यात
RE