________________
PRASTRAMRAP
ARAN
सर्व प्राण्यांबद्दल सुखाचे चिंतन करणे मैत्री आहे. त्याचे चार प्रकार आहेत१) उपकार मैत्री २) स्वकीया मैत्री ३) स्वप्रतिपन्नामैत्री ४) अखिलाश्रयामैत्री.
१) उपकार मैत्री - आपले आई-वडील, देव, गुरू, धर्माचार्य इ. बद्दल मैत्री भाव असणे उपकारमैत्री आहे.
२) स्वकीय मैत्री - उपकारी नसले तरी स्वजनसंबंधी आहेत अथवा ज्यांच्याशी नाचे संबंध आहेत अथवा जे आपले धर्म, संप्रदाय, राष्ट्रजाती वर्ण, व्यवसाय इ. शी संबंधित आहेत त्यांच्याबद्दल मैत्री भावना-स्वकीया मैत्री आहे.
३) स्वप्रतिपन्नामैत्री - जे आपल्या पूर्वजांच्या आश्रित राहिले आहेत किंवा वर्तमानात आपल्या आश्रित आहेत, त्यांच्याशी मैत्रीभाव असणे स्वप्रतिपन्ना मैत्री आहे.
४) अखिलाश्रयामैत्री - संसारात जितके प्राणी आहेत, त्या सर्वांशी मैत्री भावना असणे अखिलाश्रया मैत्री आहे.४२
संत केवलरामजी एका गाडीवानाबरोबर चालत हाते. चालता-चालता त्याला कृष्णचरितामृत ऐकवत होते. अचानक जेव्हा बैल एका ठिकाणी थांबले तेव्हा गाडीवानाने त्याला २-४ चाबकाचे फटके मारले. चाबकाच्या फटक्याने बैल जोरात पळायला लागला. गाडीवानाला जेव्हा संत मागे राहिले हे लक्षात आल्यावर मागे वळून पाहिले तर संत मूर्छित होऊन पडले होते. गाडीवान पळत जाऊन त्यांना उचलले. त्याने पाहिले की बैलांना मारलेल्या चाबकाचे वळ केवलरामजींच्या शरीरावर उमटले होते. जेव्हा प्राणीमात्राबद्दल 'आत्मवत् सर्वभूतेषु' रूपात मैत्रीभावना परिपक्व होते तेव्हा आत्मत्व आणि विश्वत्वमे अभिन्नता निर्माण होते.
मानव-जीवन सुख-शांती आणि प्रसन्नतेने व्यतीत करण्यात मैत्री सहायक आहे. दुजनाची मैत्री सुरवातीला सघन वृक्षाच्या छायेप्रमाणे वाटते पण हळूहळू क्षीण होत जाते. परतु सज्जनाची मैत्री अपरान्ह छायाप्रमाणे सुरवातीला कमी परंतु नंतर क्रमशः वाढत जाते.४३
ज्या साधकाचे हृदय मैत्रीभावनेने परिपूरित होऊन जाते, तो प्राणीमात्राच्या सल्यासाठी उत्सुक असतो. तो सर्वांना आपल्याप्रमाणे समजतो. तो चिंतन करतो.
__ "सव्व पाणा न हीलियब्वा न निंदियव्वा''४४ अर्थात कोणत्याही प्राण्याची अवहेलना करू नये व निंदाही करू नये.