________________
TARA
(६०१)
का व्यक्तीला समाप्त करण्यात जर पण संकोच करीत नाही. या भावनेमुळे
यादोषारोपण असत्यात सत्यता अशा प्रकारची विपरीत भावना विषाक्त सर्पिणीप्रमाणे मानवाला गिळंकृत करतात. म्हणून जैनाचार्यांनी मैत्री भावनेवर खूप जोर दिला आहे. जर
विहल मित्रत्वाची भावना दृढ होऊ शकली तर कुणाला मारण्यासाठी उचलेला हात आपोआप खाली येईल. मनाची ही कलुषता ज्यामुळे मानव पशू बनतो. ती पशुना नष्ट होते. मैत्री भावनेत मानवीय एकताच काय पण प्राणीमात्रांबद्दल समत्वाचा उदात्त आशय भरलेला आहे.
कोणाच्याही बद्दल वैरभावना ठेवणे विषमता आहे-वैर भावनेमुळे अनेक प्रकारचे अनर्थ ओढवतात. ईर्षा-द्वेष इ.ची उत्पत्ती होते. ने नष्ट करण्यासाठी मैत्रीभावना सक्षम आहे.
मैत्रीभावनामध्ये साधकाने असे चिंतन करावे की सर्व जीव कष्ट व्यसन इ. ने मुक्त होऊन सुखाने जगो. वैर, पाप अपमानापासून मुक्त होऊन आनंदाने जगोत.
अधिकांश लोकांना वाटते की, ज्यांच्याजवळ धन-वैभव-सत्ता-शक्ती आहे, त्यांना मैत्रीची काय आवश्यकता आहे ? पण हा केवळ भ्रम आहे. धन, सत्तेने मैत्री विकत घेता येत नाही. ती तर मनुष्याचे गुण पाहून स्वतः प्राप्त होते.
। अमेरिकेच्या कोणी पत्रकाराने धनाचा कुबेर श्री. हेनरी फोर्ड यांना विचारले, तुमच्या जीवनात कोणती एखादी अशी वस्तू आहे की जी तुम्ही पैसे देऊन विकत घेऊ शकला नाही ?" हेनरी फोर्ड म्हणाले, "जर मला माझे जीवन पुन्हा सुरू करण्याची संधी मिळाली तर सर्वात प्रथम मी मित्रांचा शोध घेईन." धन मिळाले पण दिलदार मित्र मिळाला नाही.
धन, सत्ता, ज्ञान यांच्या अहंकाराने मनुष्य मैत्रीपूर्ण हृदयापासून वंचित राहतो. सत्ता व शक्तीने गुलाम मिळतात पण मित्र मिळत नाही. मित्र मिळण्यासाठी तर नम्रता, सहानुभूतीपूर्ण निष्कपट हृदय पाहिजे. मैत्री भावना निस्वार्थ त्याग आणि उदारतेचे प्रतीक
आहे.
मूलाचारात प्रतिक्रमाणाच्या सहा आवश्यकामध्ये प्रथम आवश्यक सामायिकमध्ये वणन करताना लिहिले आहे- "सर्व जीवांशी मैत्री भाव ठेवा. आणि अशुभ परिणामचा त्याग करून ही भाव सामायिक आहे."३९