________________
प्रत्येक मित्राची इच्छा असते की आपल्या मित्राला दुःख नसावे. ज्यामुळे दुःखाचे अंकरित होते, वाढते, फूलते त्या दुःखाचे मूळच नष्ट होऊन जाते. मग दुःख समाप्त होऊन जाते.
तत्त्वार्थ सूत्राच्या व्याख्यामध्ये जैन शास्त्राचार्य श्री घासीलालजी महाराजांनी मैत्रीची व्युत्पत्ती अशी केली आहे- “मेघति स्नेहति इति मित्रं तस्य भावो मैत्री परहित चिंतारूपा" अर्थात जो स्नेह करतो त्यास मित्र म्हणावे. मित्राची भावना मैत्रीची असते, त्यात दसऱ्याच्या हिताचे चिंतन असते. समस्त प्राणीमात्रांबद्दल स्नेहात्मक परिणाम असतो. प्रमादामुळे किंवा दुसऱ्या कोणत्याही कारणामुळे कधी कोणता अपराध केला असेल तरी ह्यांच्या प्रती हाच भाव असतो की हे माझे मित्र आहेत. मी मित्राचा द्वेष कधीच करणार नाही. कारण मित्राचा द्वेष करणे हे दुर्जनाचे काम आहे. मग मी तसे कसे वागू ? मी समस्त प्राणीमात्रांबद्दल क्षमाभाव धारण केला आहे. मनात सतत असा भाव ठेवल्याने वास्तविक मैत्री भावाची प्राप्ती होते. पुढे तो अजून विचार करतो ज्यांनी माझ्यावर अपकार केला आहे ते सुद्धा माझे मित्रच आहेत. त्यांच्याबद्दल ही माझ्या मनात क्षमाभाव आहे.३०
उपाध्याय विनयविजयजी यांनी आपल्या आत्म्याला संबोधित करताना फार सुंदर शब्दात म्हटले आहे- हे आत्मन् ! सर्वत्र मैत्रीचा विस्तार कर. जगात माझा कोणीच शत्रू नाही, असे चिंतन कर या थोड्याशा जीवनात इतरांबद्दल वैरभाव ठेवन संतप्त का होतो १ या संसार सागराच्या यात्रेत सर्वप्राण्यांशी सहन वेळा तुझे बंधुत्वाचे संबंध राहिले आहेत. त्यादृष्टीने हे सर्व तुझे बंधूच आहेत, असा विचार कर. समस्त जीव अनेकवेळा तुझ्याशी पता, बंधू, काका, माता, पुत्र, पुत्री, पत्नी, बहीण, पुत्रवधु इ. संबंधाने बांधले गेले होते. या समस्त प्राण्यांच्या जगात सर्व एकाच कुटुंबाचे आहोत. तुमचा कोणी शत्रू नाही असा विश्वास ठेव. एकेन्द्रिय इ. जीव सुद्धा पंचेन्द्रियत्व प्राप्त करून उत्तम प्रकारे धर्माची आराधना करून भव-भ्रमणापासून केव्हा मुक्त होतील, असा विचार कर. ३८
- या संसारात तुच्छ एषणांमुळे ज्यांच्यात वित्तेषणा, पुत्रेषणा आणि लोकेषणा इ. कामनांची पूर्ती होत नाही ती व्यक्ती आत्मस्वभावपासून च्यूत होते. त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तो हिंसा. शत्रभाव वैमनस्य इ. विकराल बत्तीचा स्वीकार करतो. किती आश्चयोची गोष्ट आहे की ज्या पित्याने पुत्राचे पालन पोषण केले, योग्य बनविले तोच पत्याची निर्मम हत्या करतो, एक भाऊ दुसऱ्या भावाच्या रक्ताने तहान भागवतो. हे सर्व अमैत्रीचा भारत त्राचा भावनेचा परिणाम आहे. अमैत्रीचा भाव उदयास आल्याने प्रियहून प्रिय, उत्तमाहून
।
Sosatell-BHIBIG