________________
(५९८)
सर्व जीव कष्टापासून, दुःखापासून पीडेपासून मुक्त राहोत. पारस्परिक वैर, पाप, दषित कृत्य, अपमान, पराभव सोडून सुखाने जगोत असे चिंतन मैत्री भावनेचे स्वरूप
आहे.३१
आचार्य शुभचंद्र फार तत्त्वज्ञानी होते. त्यांनी मैत्री भावनेचे जे वर्णन केले ते पारच महत्त्वपूर्ण आहे. मैत्रीभाव केवळ मानवजातीपर्यंतच परिसीमित नाही. जैनदर्शन तर समस्त जीवांबद्दल मैत्रीभावनेचा व्यापक संदेश प्रदान करते. परिणाम स्वरूप साधकाच्या मनात समस्त प्राणीमात्रांबद्दल अहिंसा भाव उत्पन्न होतो. शत्रुत्व भावनाच संपुष्टात येते. तो कोणालाही, कोणत्याही प्रकारची हानी होऊ देत नाही. जेव्हा आपण कोणाला आपला मित्र मानतो मग त्याचे नुकसान कसे करणार ? करणारच नाही. कुणाला आपण आपला शत्र किंवा विरोधी, प्रतिद्वंदी मानले तरच कोणी कोणाचे वाईट करेल. हाच बारा भावनांचा महिमा आहे. जो मित्र भाव अंतःकरणात परिच्याप्त होतो तो कोणाचेही नुकसान करच शकत नाही. कोणाला आपला शत्रू, विरोधी किंवा प्रतिद्वंदी मानले तरच तो त्याचे नुकसान करतो. वाईट करतो. पण मन स्वच्छ झाले तर असे करण्याचा विचार सुद्धा मनात येत नाही. त्याची भावधारा उत्कृष्ट होत जाते “सर्वे भवन्तु सुखिना सर्वे सन्तुनिरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवते ।"
संसारातील सर्व प्राणी सुखी असावे. सर्व निरोगी, स्वस्थ असावेत. सर्वांचे कल्याण होवो. कोणालाही दुःख नसावे.
__ आज आपण जगात पाहतो परिवारिक, सामाजिक, राजनैतिक, राष्ट्रीय आणि अन्तर्राष्ट्रीय जीवन अशांत आहे. याचे एकच कारण आहे. त्यांच्यात परस्पर मैत्रीभाव नाही. त्यांच्यात आत्मीयता, निकटता, सहृदयता नाही. म्हणून इतर सर्व काही प्राप्त असूनही मानव मन अशांत आहे.
प्रतिस्पर्धा, वैर, विरोध, असहिष्णुता इ. वृत्ती मानवाच्या सुखी जीवनाला उद्ध्वस्त करून टाकतात. जर मैत्रीभाव असला तर वाईटवृत्ती आपोआप विलोप पावतात. मैत्रीभावना हृदयात जश-जशी वाढत जाते, तसतसे त्याच्या भोवतालचे वातावरण सुद्धा स्नेहपूर्ण, सौहर्दपूर्ण, सौजन्याने भरते.
परस्परातील शत्रुभाव, कलह, कदाग्रह इ. नी अशांत बनलेले जीवन मैत्रीभाव नात जागृत होताच शांती सुखाने भरून जाते. अशा उच्च भावनेमुळे अन्य अनेक पवित्र भाव उत्पन्न होतात. जेव्हा मनात शांती असते तेव्हाच भगवत् भक्ती, स्वाध्याय, ध्यान