________________
मैत्रीभावना सम्यक्त्वाचा आधार आहे. कारण की अमैत्री भावना असणाऱ्यामध्ये मानबंधी कषाय भाव असतो. जोपर्यंत एकाही जीवाबद्दल वैरभाव असेल तोपर्यंत मुक्ती प्राप्त होणे असंभव आहे.
वैराग्य भावनामुळे विषयांवर काबू प्राप्त होऊ शकतो. परंतु कषायभाव जिंकण्याचा माधा सरळ आणि शक्तिशाली उपाय मैत्री आहे. मैत्रीमुळे जीव तत्त्वाशी संबंध होतो.
गाण्याने जड (अजीव) तत्त्वाचा संबंध तुटतो. वैराग्यभावाने ममता जाते तर मैत्री इ. भावनेने समता प्रकट होते.२२
मैत्री भावनेचे आद्यउपदेशक अरिहंत परमात्मा आहेत. ते सिद्ध करणारे सिद्ध भगवन्त आहेत. जीवनात आचरण करणारे आचार्य भगवंत आहेत. मैत्रीभाव सूक्ष्म रूपाने समजणे आणि समजावणारे उपाध्याय भगवंत आहेत व अंतरवाह्य जीवनात त्याची साधना करणारे साधू भगवंत आहेत.२३
___ या पाचांना नमस्कार हे अमैत्री भावरूप पापाचा नाश करणारा आहे. आणि स्नेह भाव विकसित करून सर्व मंगल ओढून आणणारा आहे.
। जिथे मैत्री इत्यादी भाव नाहीत तिथे धर्म नाही. ज्याप्रमाणे ज्यात गोडपणा नाही तो गूळ नाही. तसे पाहिले तर मैत्री भावना मनोयोगाचा व्यापाररूप असल्याने शुभाश्रय आहे. परंतु त्याच्या प्रभावामुळे आत्म्यात प्रकट होणार मैत्रीभाव मोहाचा क्षयोपक्षम आहे. म्हणून त्यास संवररूप समजायला पाहिजे. मैत्री इ. भावना धर्मध्यानाचे मूळ आहे. त्यातून जेव्हा त्याचा वृक्ष बनतो तेव्हा मोक्षरूपी फळ प्राप्त होते.२४ मैत्रीभावनेच्या पुढे जाऊन विशिष्ट बनलेला आत्मोपम्य भाव निश्चितच धर्माचा प्राण आहे.
आत्मवत् सर्व भूतेषु, सुख-दुःखे प्रियाप्रिये । __चिन्तयन् आत्मनोऽनिष्टा हिंसामन्यस्य मा चरते ॥२५
जो सर्व प्राणीमध्ये आपल्या आत्म्याप्रमाणे सुख प्रिय, दुःख अप्रिय आहे, हे मानतो, तो स्वतःप्रमाणेच इतरांची अनिष्ट हिंसेपासून दूर राहतो.
जे अञ्झत्थ जाणई से बहिया जाणई ।
जे बहिया जाणई से अझत्थ जाणई एवं तुल्लामन्नेसिं । जो आपल्या आत्म्याच्या सुख-दुःखाला जाणतो, तो तत्त्वाने दुसऱ्यांच्या जीवांच्या खादानाही जाणतो. हा तुल्यता अर्थात आत्मोपम्य भाव तत्त्व समजायला पाहिजे.२६