________________
वित्र कार्यात रुची निर्माण होते. खरी अभिरुची क्रिया किंवा प्रवृत्तीमध्ये सहजपणे ने अशाच प्रकारे सहजमैत्रीभाव जीवनात अनेक प्रकारची 'सात्त्विकता' उत्पन्न
करतात.
ज्याप्रमाणे एक दिवा लावला तर त्याने अनेक दिवे लावले जातात, त्याचप्रमाणे एका उदात्त भावनेने उदिप्त झाल्याने अनेकानेक उत्कृष्ट भावना चमकायला लागतात.
आचार्य हेमचंद्रांनी योगशास्त्रात मैत्रीभावनेचे वर्णन सुंदर केले आहे. जगातील कोणत्याही प्राण्याने पापपूर्ण कार्य करू नये. दुःखाचे पात्र बनू नये. समस्त प्राणी दुःखमुक्त व्हावेत अशाप्रकारची भावना मैत्री भावना आहे. ३२
मार्गानुसारीच्या ३५ गुणांत आणि श्रावकाच्या एकवीस गुणांमध्ये परार्थ भावनेला ज्ञानीजनांनी अग्रस्थान दिले आहे. ज्ञानी तत्त्वचिंतनाची गणना अध्यात्मामध्ये तेव्हा करतात जेव्हा त्याच्यात मैत्री इ. भाव असतील.
मैत्रीचे स्वरूप परहित चिंता मैत्री३३
म्हणजे इतरांच्या सुखाच्या हिताची चिंता करणे मैत्री होय. याच भावनेला अध्यात्मकल्पद्रुमात काही शब्द बदलून म्हटले आहे. मैत्री परस्मिन् हितधीः समग्रे.३४
योगशास्त्राच्या टीकेत म्हटले आहे - समस्त तत्त्वविषयक स्नेपरिणाम मैत्री३५ हृदयात सर्व जीवांच्या बद्दल स्नेह हीच मैत्री आहे.
मैत्रीच्या स्वरूपाबद्दल लिहिले आहे- मैत्री पापी आणि दुःखी जीवांबद्दल करणारूपाने व्यक्त होते. गुणी आणि सुखी आत्म्यासंबंधी प्रमोद रूपाने आणि धर्म व धमीलोकांबद्दल द्वेष करणाऱ्या प्रती करुणापूर्ण उपेक्षा म्हणजे माध्यस्थरूपाने व्यक्त होते. तात्पर्य, करुणा प्रमोद व माध्यस्थ हे ही मैत्रीचेच स्वरूप आहेत,
श्री जिनेश्वर देव निर्दिष्ट दान व सामायिक किंवा सर्वविरतिपर्यंत सर्व व्यवहार मागीत मैत्री, प्रमोद, करुणा आणि माध्यस्थ या चारही भावना त्यात समाविष्ट आहेत. या भावनांचा विकास आणि आत्मविकास बरोबर होतो.
- जीवसृष्टीसंबंधी वरील चार भावनांच्या ऐवजी हृदयात द्वेष, मत्सर, घृणा, तिरस्कार २. भाव घर करून राहिले असतील तर समजावे की अजून मुक्तीचा मार्ग हाती लागला नाही.३६