________________
(८९७)
मैत्री भावयतो नित्यं शुभो भावः प्रजायते । ततो भावोदकाजन्तो द्वेपानि रूप शाम्यति ॥२७
निरंतर मैत्री भाव जोपासणाऱ्याला शुभभाव उत्पन्न होतो. आणि शुभभावरूपी जाने आत्म्याचा द्वेषानी शमन होतो.
सर्व जीवांना आपल्या आत्म्यासमान मानणे, पाहणे आणि संयमाचे पालन केले तर पाप कर्माचे बंध होत नाही. २८
मैत्री भावना निःस्वार्थ त्याग आणि उदारताचे प्रतीक आहे. बाकी सर्व संबंध कोणत्या ना कोणत्या स्वार्थावर आधारित असतात. परंतु मित्रता विशुद्ध हृदयाची अभिव्यक्त आहे. त्यात छल, कपट, स्वार्थ किंवा मोह यांना कोणतेही स्थान उरत नाही.
आज लोक दयेच्या अभावाला पाप मानतात. पण मैत्रीच्या अभावाला पाप मानत नाही. हे अज्ञान आहे. मैत्रीशिवाय दया मीठा शिवायचे जेवण शिवायच्या जेवणाप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे प्रजेतील कोणतीही व्यक्ती इतर कोणत्याही व्यक्तीचे अहित करतो तर तो गुन्हेगार बनतो. तसेच मैत्रीरहित जीव विश्व आणि जिनशासनचा द्रोही आहे. मैत्री इ. भावना लौकिक आणि लोकोत्तर दोन्ही प्रकारच्या जीवन व्यवहारासाठी परस्पर आवश्यक आहे.
नमस्काराने जीव मैत्री सिद्ध होते. जीवाशी अमैत्री मोठे पाप आहे. महा मिध्यात्व आहे. परमसत्य अशी जीव तत्त्वाचा विरोध आहे. अनंता अनंत आत्म्याची परम उपेक्षा आहे, अनादर आहे. अवगणना आहे, परम संकुचितता आहे आणि चैतन्यतत्त्वाबद्दलची मूढ भावना आहे. यांचा नाश एका मैत्री भावनानेही संभव आहे. २९
वादविवाद करण्याने, अर्थसंबंधी अर्थात धनासंबंधी याचना करण्याने, सियांशी अधिक संपर्क ठेवल्याने घेण्याचीच भावनेला अग्रगण्य स्थान दिल्याने मैत्री भंग पावते. संकुचितता, स्वार्थ, कपट इ. मैत्री भावनेत वाधकतत्त्व आहेत. भावना सहयोग, सहानुभूती, दूदर्शिता उदारता, निःस्वार्थता, निश्चलता आणि आत्मीयता, बन्धुता इ. आवश्यक साधक तत्वे आहेत. ३० म्हणून विविध लोकांनी मैत्रीभावनेत वृद्धी करण्यासाठी विविध भाव प्रकट केले आहेत.
1
आचार्य शुभचंद्रजी मैत्री भावना संबंधी लिहितात की सूक्ष्म, स्थूल, नस, स्थावर इ. विभिन्न योनीत भिन्न-भिन्न स्थितीत असणाऱ्या जीवांबद्दल एक समान भावना, समीचीन भावना म्हणजे मैत्रीभावना आहे.