________________
NABARAHAR
जीवनात कधी अनुकूलता असते तर कधी प्रतिकूलता, साधक तोच आहे जो परिस्थितीत समभावाने राहतो. ज्याच्यात समभाव आहे, त्याच्या मनात शत्रूत्व कधी उत्पन्न होऊ शकत नाही.
__ मैत्रीचा व्यापक अर्थ पदार्थ जगत् आणि चैतन्य जगात सन्तुलन स्थापित करणे आहे आ.आंददापीजी म. नी 'भावनायोग' पुस्तकात फार सुंदर उदाहरण दिले आहे. एकेकाळी लिंकनचे शत्रू खूप होते. लिंकन त्यावेळी राष्ट्रपती होते. त्यांचे हितचिंतक त्यांना नेहमी म्हणत, तुमच्या हातात सत्ता आहे. त्याचा उपयोग शजूंना नाबूद करण्यासाठी का नाही करत ? राष्ट्रपती लिंकनने उत्तर दिले- मी माझ्या शत्रूना सद्व्यवहाराने समाप्त करतो. काही काळानंतर ते माझे मित्र बनतील. शत्रूला नष्ट करण्यापेक्षा शत्रुत्व समाप्त करणे हाच विरोधी पक्षाला समाप्त करण्याचा उपाय आहे.
मैत्रीचा विकास करण्यासाठी शक्ती आणि निर्मलतेचा विकास करण्याची आवश्यकता आहे.१८
आपल्या एकुलत्या एक मुलावर आई जसे प्रेम करते तसेच संसारातील प्रत्येक प्राण्यावर आपला स्नेह असावा. १९
मैत्र्या भूमिरतीव रम्या, भव्य जन रेव गम्या । निन्दन्त्यप कुर्वन्ति येवा ध्वन्ति द्वेषात् यष्टिभिरेव ।
मत्वा तेषां कर्म-प्रदोषम्, नैरपि मैत्री न छद्या ।।२० अर्थात मैत्री भावनाची भूमी अत्यंत सुंदर आहे. भवी लोकच तेथपर्यंत पोहोचू शकतात. कोणी निन्दो किंवा वन्दो कोणाहीबद्दल मनात द्वेष येऊ नये. असा प्रसंग आला तर विचार करावा की याचा काय दोष आहे ? हे तर माझ्याच कर्माचे फळ आहे. द्वेष विरोध करणाऱ्यांवरही द्वेषभाव नसावा. ही खरी मैत्री भावना आहे.
MARRHORN
आपल्या मित्राशी जसे आपण वागतो. ज्या प्रेमाने वागतो, व्यवहार करतो पाचप्रमाणे संसारातील प्रत्येक जीवाबरोबर प्रेमाने वागावे. ही मैत्री भावना आहे. मैत्रीमध्ये बान आत्म्याचे मिलन होते. देह नष्ट होतो, पण मैत्री कधी नष्ट होत नाही. कारण ती
दहातीत आत्म्याबरोबर असते.
प्रमभाव, मित्रभाव, शभचिंतन, सख्यता, सदभावना, सहयोग हितैषिता, इ. मैत्रीचे समानार्थी शब्द आहेत.२१