________________
(५९३)
मुक्त होण्यासाठी एकमात्र अनन्य उपाय 'मी सुखी व्हावे' या ऐवजी सर्वांनी सुखी व्हावे
ह्या भावनेच सेवन करावे.
( अशाप्रकारची भावना चित्ताचे संक्लेश दूर करण्यासाठी सांगितली आहे. या भावनामध्ये मैत्री भावना मुख्य आहे. या भावनेचे विशेष महत्त्व आहे. वास्तवात ही भावना ज्ञा भवनशिनी आहे. धर्मबिंदू ग्रंथात हरिभद्रसूरींचे प्रसिद्ध कथन आहे.
"मैत्रादि भाव संयुक्त तद्धर्म इति कीर्त्यते' अर्थात मैत्रादी भावनेने युक्त क्रियानांच
धर्म म्हणतात.
अटूट
भावाद् भाव प्रसुतिः भावनेने भाव उत्पन्न होतात. अहिंसा, संयम तपाचा भावनेचा संबंध आहे. मैत्री, वैराग्य आणि अनासक्तीचा जीवनात प्रत्यक्ष आचरण आहे. ज्याप्रमाणे आचार शुद्धीसाठी अनशन, उणोदरी इ. बाह्यतप आवश्यक आहेत त्याचप्रमाणे विचार शुद्धीसाठी प्रायश्चित, विनय, वैयावच्च, स्वाध्याय इ. आभ्यंतर तप आवश्यक आहेत. मैत्रादी भावनामुळे आचरणात अहिंसा, विचारात विश्वमंगलची भावना उत्पन्न
होते.
संत कबीर सुद्धा आत्मवत् सर्वभूनेषु भावना व्यक्त करताना म्हणतात" ज्यूं जलमे प्रतिबिंब त्युं सकल रामहि जाणिजे '१२
जीव जेव्हा असा विचार करतो की कोणताही जीव तो उपकारी असो किंवा अपकारी त्याने पाप करू नये. दुःखी राहू नये. आणि सर्व संक्लोषापासून मुक्त रहावे. तेव्हा त्याच्या चित्तातील संक्लेश शांत होत आहेत असे दिसते.
आपल्या धर्मानुष्ठाच्या सफलतेचा आधार मैत्रीभावनेच्या दृढतेवर अवलंबित आहे. ज्या अनुष्ठानाच्या मागे या भावनेचे बळ नाही त्या अनुष्ठानाला धर्मानुष्ठान म्हणता येणार नाही. १३
म्हणून हरिभद्रसूरींचे वरील कथन सत्य आहे की, मैत्री इ. भावनेने युक्त क्रियाच धर्म आहे. उत्तराध्ययन सूत्रात म्हटले आहे
मित्त भावमुवगए यावि जीवे भावविसोहिं काऊण निष्भए भवई १४ अर्थात ज्या जीवाने मैत्री भाव प्राप्त केला आहे त्याची भाव विशुद्धी होऊन तो निर्भय होऊन जातो. भ. महावीरांनी सांगितले आहे साधकाने स्वतः सत्याची शोध घ्यावा. आणि विश्वातील सर्व प्राणीमात्राबद्दल मैत्रीभावाचा संकल्प करावा. १५