________________
(५०४)
जर पूर्वग्रहामुळे अति द्वेषपूर्ण विचारांनी मन दूषित झाले असेल तर ज्या व्यक्तीबद्दल मनात द्वेष भरला असेल त्याच्याबदल मैत्री भावना जागृत करावी. त्या व्यक्तीने पूर्वी कधी थोडासा जरी उपकार केला असेल तर तो आठवावा. यामुळे मनात शुभभावना गतिमान होतील. १६
सम्यक्त्याच्या शुद्धिसाठी देव, गुरू, धर्माची भक्ती आवश्यक आहे. आणि देव धर्माच्या भक्तीसाठी मैत्री भावना तर अत्यंत आवश्यक आहे.
गुरु
मैत्रीसाठी पातंजल योगाचा एक प्रसिद्ध सूत्र आहे
"अहिंसाप्रतिष्ठायां तत्सन्निधी वैरत्यागः" अर्थात एखाद्याच्या मनात अहिंसा सिद्ध झाली तर त्याच्या आजुबाजूच्या वातावरणात वैरभाव फिरकत सुद्धा नाही. महान तपस्वी साधू अथवा सिद्ध योगी यांच्या सान्निध्यात असा अनुभव येतो.
ज्यांच्या मनात मैत्रीभावना असते त्यांचे चिंतनच असे असते "श्री श्रमणसंघामध्ये शांती येवो. जनपदांना शांती लाभो, राजा अधिकारी (प्रेसिडेंट वगैरे) यांना शांती मिळो. राजाच्या आसपास वावरणाऱ्या मंत्री, प्रधानमंत्रीमंडळ यांना शांती प्राप्त होवो. नातेवाईकांना शांती मिळो. ग्राम - शहरवासियांना शांती मिळो. मैत्री भावनामध्ये विश्वजीवदया इतकी विशाल होऊन जाते की माझे-तुझे असा भेदभाव करण्याची इच्छाच नाश पावते. तो अंतःकरणपूर्वक म्हणतो
शिवमस्तु सर्वजगतः परहित निरता भवन्तु भूतगणा ।
दोषां प्रयान्तु नाशं सर्वत्र सुखी भवतु लोकाः ।।
अर्थात जगाचे कल्याण होवो, सर्वप्राणी परहित करण्यात तत्पर होवो. सर्वांचे दोष दूर होवोत. सर्व जगातील लोक सुखी होवो. यात स्वजन, स्वमतावलंबी स्व-संबंधीचाच फक्त समावेश नाही तर सर्व जगासाठी मैत्री भावना आहे.
मैत्री म्हणजे सौहार्द्र इतरांना सुखी पाहून कलुषित होणारे लोक ईर्षालू असतात. मैत्री भावना केल्याने हा दोष नष्ट होऊन जातो.
सभाप्य तत्त्वार्थधिगम सूत्रात मैत्रीचे वर्णन करताना श्री उमास्वातीजी लिहितात. "मी सर्व प्राणीमात्रांना क्षमा करीत आहे. सर्व प्राणी मला क्षमा करोत. सर्व प्राणीमात्राशी
माझा मैत्रीभाव आहे. कोणाही बरोबर माझा वैरभाव नाही. अशाप्रकारे अपराध केले असतील अथवा नसतील तरीही सर्वांशी मित्रता भाव ठेवल्याने इहलोक आणि परलोक दोन्ही ठिकाणी दुःखापासून मुक्ती मिळते. १७